Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

आरोपीचा ‘तो मी नव्हेच’ दावा न्यायालयात पडला उघडा


पुणे : नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या निर्घृण अत्याचार व हत्येच्या प्रकरणातील मुख्य आरोपी भीमराव कांबळे याने न्यायालयात धक्कादायक व खोटा जबाब दिला. त्याने आपल्यावरील सर्व आरोप पूर्णपणे फेटाळले आणि सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती स्वतः नसल्याचा दावा केला. मात्र, फुटेज झूम करून दाखवताच त्याचे खोटेपण उघड झाले.
कोर्टाने आरोपीला ८८ प्रश्न विचारले. प्रत्येक प्रश्नाला त्याने ‘नाही’ असे उत्तर दिले. सीसीटीव्हीतील व्यक्ती मी नाही, असे त्याने चार वेळा ठासून सांगितले. मात्र, फुटेज अधिक स्पष्ट करून दाखवल्यावर त्याने मान्य केले की तो व्यक्ती स्वतःच आहे. तरीही चिमुकली कोण होती हे माहिती नसल्याचे सांगून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला.
आरोपीने नंतर आपली बाजू मांडताना सांगितले की, घटनेच्या दिवशी तो राम मंदिरात गेला होता. तेथून घायवळांच्या शेडजवळ गेल्यावर ती मुलगी आली. त्याने तिला गाठी-शेव दिली. गोठ्यात नेताना पाय घसरल्याने मुलगी पडली आणि तिच्या डोक्याला जखम झाली. ती रडू लागल्याने तिला कॉटवर झोपवले. लोक आरोप करतील म्हणून तिला तेथेच सोडून तो काळूबाई मंदिराजवळ कट्ट्यावर बसला, असा दावा त्याने केला.
या खटल्याची सुनावणी आता अंतिम टप्प्यात आहे. आतापर्यंत ५५ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या आहेत. वैद्यकीय पुरावे, डीएनए प्रोफाइल, बाल साक्षीदाराची साक्ष आणि वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर आहेत. सायबर तज्ज्ञ आणि मुख्य तपास अधिकारी यांच्या साक्षीही नुकत्याच पूर्ण झाल्या. रोज सुनावणी होत असल्याने महिनाभरात निकाल लागण्याची शक्यता आहे. ही घटना १ मे रोजी नसरापूर परिसरात घडली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading