डॉक्टर्स, नर्स व कर्मचाऱ्यांचा भगवद््गीता देऊन सन्मान

पुणे : विश्व हिंदू परिषद, विशेष संपर्क विभाग व इस्कॉन पुणे यांच्या वतीने भवानी पेठेतील श्रीमती सावित्रीबाई फुले प्रशाला येथील कोरोना चाचणी केंद्रातील सर्व डॉक्टर्स, नर्स, टेक्निशियन व सेवक बंधू-भगिनींचा त्यांच्या सेवेबद्दल ८० जणांचा कृतज्ञता व्यक्त करून भगवद््गीता व लाडू प्रसाद कृतज्ञता भेट देऊन गौरव करण्यात आला. 
सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून केलेल्या सन्मान सोहळ्याला क्षेत्रीय आरोग्य प्रमुख डॉ. सारंग कालेकर, इस्कॉनचे संजय भोसले, विश्व हिंदू परिषदेचे किशोर चव्हाण, रा.स्व.संघाचे मंगेश शिंदे, नरेश आडेप, रुपेश नाईक  व कुणाल जगताप उपस्थित होते. 
किशोर चव्हाण म्हणाले, सर्व सेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी आपले कर्तव्य बजावले याचे कौतुक करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त  करीत आहोत. नागरिकांना सेवा देणे हे जरी त्यांचे काम असले, तरी देखील आपुलकीने हे रुग्णांना सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान करुन त्यांच्या पाठीमागे उभे राहणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.  

Leave a Reply

%d bloggers like this: