विद्यार्थांना सक्षम  नागरिक करण्यासाठी लायन्स क्लबचा देशव्यापी प्रकल्प

लायन्स क्लब ,’लाईफ स्कूल ‘च्या ‘ भारत@१००’ प्रकल्पाची पुण्यात घोषणा

पुणे, दि. १७ – विद्यार्थांना  सक्षम  नागरिक करण्यासाठी  शिक्षण, व्यक्तिमत्व विकसन, करीयर मार्गदर्शनाच्या संधी देणाऱ्या  ‘भारत@१००’ (भारत अॅट हंड्रेड ) प्रकल्पाची घोषणा  पुण्यात करण्यात आली आहे . लायन्स क्लब इंटरनॅशनल, लाईफ स्कुल,किप मुव्हींग मुव्हमेंटचा हा देशव्यापी प्रकल्प आहे.

माहिती तंत्रज्ञान उद्योगातील तज्ज्ञ ,’फाईव्ह एफ वर्ल्ड ‘ या डिजिटल स्टार्ट अप व्यासपीठाचे संस्थापक  डॉ. गणेश नटराजन, लायन्स क्लबचे प्रांतपाल अभय शास्त्री , माजी प्रांतपाल आणि ‘भारत@१००’  चे प्रकल्पप्रमुख  राज मुछाल, किप मुव्हींग मुव्हमेंटचे संस्थापक नरेंद्र गोयदानी  यांनी पुण्यात  गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत या देशव्यापी प्रकल्पाची घोषणा केली.विद्यार्थी आणि  युवकांना  या प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे मार्गदर्शन करण्यासाठी  मार्गदर्शक समिती(मेंटरिंग कमिटी ) स्थापन करण्यात आली असून डॉ गणेश नटराजन हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत  

 सुनील जाधव, श्रेयस दीक्षित, ज्योती गोसावी संयोजन समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ही पत्रकार परिषद झाली.अभय शास्त्री , माजी   राज मुछाल,नरेंद्र गोयदानी  यांनी पत्रकारांशी संवाद साधला ,डॉ  नटराजन हे ‘झूम ‘ द्वारे सहभागी झाले . 

या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय पातळीवर एक ऑनलाईन निबंध आणि व्हिडीओ मनोगत स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या प्रकल्पात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके ,प्रमाणपत्राबरोबर शैक्षणिक मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकसन, करीयर मार्गदर्शनाच्या,संवादाच्या  संधी मिळणार आहेत. त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात नेतृत्व करण्यासाठी नेतृत्व विकसनाच्या संधी त्यांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्या -त्या क्षेत्रातील ‘ रोल मॉडेल्स ‘ ना भेटण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आवडीच्या करीयर क्षेत्रनिहाय या विद्यार्थी, युवकांचे गट तयार केले जाणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व परिस्थिती ही नाट्यमयरित्या बदलली आहे. हा कठीण काळ निभावून नेण्यासाठी, काहीतरी वेगळं आणि खास करण्याची नितांत गरज आहे आणि ही काळाची गरज ओळखून ही अतिशय नाविन्यपूर्ण योजना घेऊन येत आहोत. देशातील विद्यार्थी,तरुणांना सक्षम करण्यासाठी  “भारत @ 100” प्रकल्प आखला आहे, असे अभय शास्त्री यांनी सांगितले.

 ‘आपण भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे . हा देश महान होण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे . नवी पिढी सक्षम होण्याची गरज आहे . देशासाठी ,समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा निर्माण करण्याचे योजनाबद्ध प्रयत्न असले पाहिजेत . त्यातून उद्याचे नेतृत्व घडेल. युवकांचा दृष्टीकोन व्यापक करण्यासाठी ,त्यांना  सक्षम करण्यासाठी,   भक्कम हेतु देण्यासाठी  समाजातील सर्व क्षेत्रांचे पाठबळ मिळवून देऊ. कार्पोरेट क्षेत्रातील संधी उपलब्ध करून देऊ, सक्षम युवाशक्तीच्या जोरावर  आत्मनिर्भरता शक्य  आहे ,’  असे डॉ. गणेश नटराजन यांनी सांगितले.  “भारत @ 100”. शतकोत्तर स्वातंत्र्यात जेव्हा भारत देश पदार्पण करेल, तेव्हा तुमचा दृष्टिकोन काय असेल ? हे सिद्ध करण्यासाठी भारतातील तरुणांना ( वय वर्षे 14 ते 24 )  प्रोत्साहित केले जाणार आहे. आता  विद्यार्थीदशेत असलेली ही मुले तेव्हा भारताचे जबाबदार नागरिक आणि ‘थॉट लिडर ‘ असतील.’लाईफ स्कूल ‘ आणि लायन्स क्लब च्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा प्रकल्प संपूर्ण भारतभर राबवला जाणार आहे,असे नरेंद्र गोयदानी ,राज मुछाल यांनी सांगितले. 

देशाचे शतक ,माझे संकल्प चित्र : व्हिडीओ मनोगत ,निबंध स्पर्धा

 फक्त दोन प्रश्नांची उत्तरे तरुणांनी द्यायची आहेत.आपल्या देशाच्या शंभराव्या वर्षी, तुम्हाला भारताला कसं बघायला आवडेल?. आपल्या देशाच्या ,भारताच्या शंभराव्या वर्षात तुम्हाला कोणती भूमिका बजवायला आवडेल ? यासाठी एक मिनिटाचा व्हिडिओ बनवून 7741075000 या नंबर वर पाठवावा. किंवा 250-300 शब्द मर्यादेत निबंध लिहून http://www.bharatat100.com/essayया वेबसाइट वर 
पाठवावा.contact@bharatat100.com  या ईमेल वर देखील पाठवता येईल.  

 सहभागाचे प्रशस्तीपत्रक देण्यासाठी एक गुगल फॉर्म प्रत्येकाला पाठविला जाईल.यातून ज्यांची निवड केली जाईल त्यांना पुढील कार्या साठी मार्गदर्शक दिला जाईल. ज्या तरुणांची उद्दिष्टे सारखीच असतील, अशांचा एक ग्रुप केला जाईल. निबंध आणि व्हिडीओ पाठविण्याचा कालावधी  14 नोव्हेंबर 2020 पर्यंत आहे . निकाल  26 जानेवारी 2021  ला जाहीर करण्यात येणार आहेत. 
विद्यार्थ्यांना  फायदा :स्वप्नातील भारत निर्माण करण्याची संधी   

या प्रकल्पातील सहभागामुळे विद्यार्थ्यांना  ध्येयनिश्चिती करण्यास मदत होईल. स्वतःची प्रतिमा उंचावण्यासाठी एक नामी संधी विद्यार्थ्यांना मिळेल.  आपल्या देशातील काही उत्तम लोकांशी सुसंवाद साधण्याची संधी त्यांना मिळेल. त्यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची एक संधी त्यांना मिळेल. समाजात होणाऱ्या घडामोडींबद्दल त्यांना असहाय्य वाटणार नाही उलट ते योग्य पद्धतीने त्याला वाट दाखवतील.

Leave a Reply

%d bloggers like this: