कोरोना – राज्यात आज 23 हजार 365 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, 474 जणांचा मृत्यू
पुण्यात दिवसभरात 2120 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
मुंबई – राज्यात आज 23 हजार 365 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 474 मृतांची नोंद झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जातेय. तर आज 17 हजार 559 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आजच्या नव्या रुग्णसंख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा 11 लाख 21 हजार 221 पर्यंत पोचला आहे. यामध्ये 30 हजार 883 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर, 7 लाख 92 हजार 832 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.तर सध्या 2 लाख 97 हजार 125 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
पुणे शहर ..!
………
- दिवसभरात 2120 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात 1883 रुग्णांना डिस्चार्ज.
- 43 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
- एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 124568
- ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 17672
- एकूण मृत्यू – 2918
- एकूण डिस्चार्ज- 103978