पंडित रामकृष्‍ण त्‍याचा निर्दोषपणा सिद्ध करून विजयनगरला विकण्‍यापासून कशाप्रकारे वाचवेल?

रामा पुन्‍हा एकदा संकटामध्‍ये सापडला आहे! बुद्धिमानी पंडित रामकृष्‍णावर (कृष्‍णा भारद्वाज) राजा कृष्‍णदेवरायची (तरूण खन्‍ना) कोणतीही परवानगी न घेता विजयनगरचा भाग हिमदोंग राजाला (सत्‍यजित गावकर) विकल्‍यानंतर विश्‍वासघातकी म्हणून आरोप करण्‍यात आला. सोनी सबवरील मालिका तेनाली रामा प्रेक्षकांना रोमांचक अनुभव देण्‍यास सज्‍ज आहे, जेथे मालिकेमधील अत्‍यंत लोकप्रि‍य प्रमुख पात्र पुन्‍हा एकदा एका आव्‍हानाचा सामना करताना दिसणार आहे. पण यावेळी त्‍याच्‍यावर विश्‍वासघातकीम्हणून आरोप लावण्‍यात आला आहे. आगामी एपिसोड्स प्रेक्षकांसमोर काही धक्‍कादायक उलगडा करणार आहेत. मालिकेला रामाची बुद्धी व हुशारीसह लक्षवेधक पटकथेसाठी प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम व पाठिंबा मिळत आहे.

विजयनगर दरबारामध्‍ये स्थिती धक्‍कादायक वळण घेते, जेथे कृष्‍णदेवरायला रामाच्‍या विश्‍वासघातकी कृत्‍यांबाबत समजते. हिमदोंग राजा सर्वांना सांगतो की,तो विजयनगरचा अधिकार असलेलामालक आहे आणि पंडित रामकृष्‍णने त्‍यांना तो भूभाग विकलेला होता. क्रोधित झालेला कृष्‍णदेवराय रामाला ७ दिवसांमध्‍ये त्‍याचा निर्दोषपणा सिद्ध करण्‍याचा आदेश देतो. पण सर्व पुरावे त्‍याच्‍याविरोधात असतात.

आपल्‍या बुद्धीचा वापर करत रामा सर्वांना वादग्रस्‍त जमिनीच्‍या ठिकाणी एकत्र बोलावतो. रामा विजयनगरचे संपूर्ण साम्राज्‍य विकण्‍याचे मान्‍य करतो, पण एका अटीवर, हिमदोंग राजाने त्‍याच्‍या पायाखालील जमिनीचा एक तुकडा विजयनगरच्‍या नावे करावा. म्‍हणजेच हिमदोंग राजा जेथे-जेथे चालत जाणार तो जमिनीचा भाग विजयनगरच्‍या नावे केला जाणार.

रामाची युक्‍ती समजल्‍यानंतर क्रोधित झालेला हिमदोंग राजा विजयनगरला डास दूर करणा-या रिपेलण्‍ट तेलाचा पुरवठा थांबवतो. ज्‍यामुळे साम्राज्‍यामधील नागरिकांना डासांचा मोठा त्रास होऊ लागतो, ज्‍यामधून विविध आजार होण्‍याची शक्‍यता वाढते.

पंडित रामकृष्‍ण विजयनगरमधील डासांच्‍या धोक्‍यासाठी कशाप्रकारे उपाय शोधून काढेल?

पंडित रामकृष्‍णची भूमिका साकारणारा कृष्‍णा भारद्वाज म्‍हणाला,”पंडित रामकृष्‍ण सर्वात मोठ्या आव्‍हानाचा सामना करणार आहे. विश्‍वासघातकीम्हणून आरोप करण्‍यात आल्‍यानंतर त्‍याच्‍यासमोर आता घातक आजारांच्‍या प्रादुर्भावापासून साम्राज्‍याचे संरक्षण करण्‍याचे आव्‍हान आहे. रामा कोणत्‍याही स्थितीचे बुद्धीने व हुशारीने निराकरण करण्‍यासाठी ओळखला जातो. तो रिपेलण्‍ट तेलाशिवाय विजयनगरमधील डासांचा प्रादुर्भाव कशाप्रकारे दूर करतो हे पाहणे रोमांचक असणार आहे. हिमदोंग राजा सातत्‍याने विजयनगरविरोधात कटकारस्‍थान रचत आहे आणि आगामी एपिसोड्समध्‍ये रामा त्‍याला थांबवण्‍यासाठी कशाप्रकारे योजना आखतो हे पाहायला मिळणार आहे. पाहत राहा तेनाली रामा आणि त्‍याची रोमांचक व धमाल कथा पाहण्‍याचा आनंद घ्‍या.

Leave a Reply

%d bloggers like this: