कोरोना – राज्यात आज २० हजार ४८२ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण; तर सर्वाधिक ५१५ बाधितांचा मृत्यू

मुंबई, दि. १५ – देशासह राज्यभरात कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याचेच दिसत आहे. आज राज्यात दिवसभरात २० हजार ४८२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, ५१५ रुग्णांचा आज मृत्यू झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १०,९७,४२३ वर पोहोचला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आज १९,४२३ रुग्णंना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत ७,७५,२७३ रुग्ण बरे झाले आहेत. तर अजूनही राज्यात २,९१,७९७ इतके अॅक्टिव्ह रूग्ण असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७०.६२ % एवढे झाले आहे तर राज्यात आज ५१५ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आल्याने सध्या राज्यातील मृत्यू दर २.७७ % एवढा झाला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५४,०९,०६० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १०,९७,८५६ (२०.२९टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.यासह सध्या राज्यात १७,३४,१६४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३७,२२५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याच्या आरोग्या विभागाकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: