Wednesday, June 17, 2026
PUNE

अल्पसंख्याक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनी प्रि –मॅट्रीक शिष्यवृत्तीकरीता ऑनलाईन अर्ज 31 ऑक्टोंबरपर्यत सादर करावेत

पुणे,दि.15: – 15 कलमी कार्यक्रमानुसार धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी राज्यातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौध्द, शीख्, पारसी व जैन या धार्मिक अल्पसंख्याक इयत्ता 1 ली ते 10 वी च्या वर्गामध्ये शिकणा-या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना केद्र शासनाद्वारे प्रि –मॅट्रीक शिष्यवृत्ती देण्यात येत असल्याची माहिती अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी दिली आहे.
नवीन व नुतनीकरण विद्यार्थ्यांने अर्ज ऑनलाईन सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2020 अशी असून याकरीता असलेल्या अटी व शर्तीनुसार इयत्ता 1 ली ते 10 वीच्या सर्व शासकीय / निमशासकीय / खाजगी अनुदानित / विना अनुदानित / कायम विना अनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित मान्यताप्राप्त शाळांकडून शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी ही लागू आहे. अर्जदार विद्यार्थी मागील वर्षी 50 टक्के पेक्षा जास्त गुणाने उत्तीर्ण झालेला असावा. फक्त् इयत्ता 1 ली च्या विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट लागू राहणार नाही. पालकांचे वार्षिक उत्पन्न् रुपये एक लाखांपेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील 2 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही. अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा धर्म, कुटुंबाचे उत्पन्न ,गुण व टक्केवारी इत्यादी माहिती अचूक भरावी. धर्म,उत्पन्न, गुणपत्रक, आधारकार्ड / आधार नोंदणी पावती, विद्यार्थ्याचा फोटो, बँक पासबुकच्या पहिल्या पानाची प्रत इत्यादी कागदपत्र मुख्याध्यापकांना सादर करावीत. पालकांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे सक्षम अधिका-याने प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ह्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यानी इतर तत्सम शिष्यवृत्तीचा लाभ घेतलेला नसावा. एकूण पात्र विद्यार्थ्यांपैकी 30 टक्के शिष्यवृत्ती विद्यार्थीनीसाठी राखीव आहे.
याकरीता असलेल्या सूचनांप्रमाणे सन 2019-20 मध्ये शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या / शिष्यवृत्ती मिळालेल्या आणि यावर्षी शिष्यवृत्तीच्या अटी पूर्ण करणा-या सर्व विद्यार्थ्यांनी सन 2020-21 करिता नुतनीकरण विद्यार्थी म्हणून अर्ज ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. नवीन अथवा नूतनीकरण यापैकी एकाच प्रकारचा अर्ज विद्यार्थ्यांना भरता येईल तसेच एका विद्यार्थ्यांने नवीन / नुतनीकरणासाठी दोनदा अर्ज भरला असेल तर असे अर्ज बाद ठरवले जातील. विद्यार्थ्यांचे बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेचे पाहिजे, नसेल तर पालकांच्या राष्ट्रीयकृत बँक खात्याची माहिती अर्जात भरता येईल परंतु हे बॅक खाते क्रमांक फक्त 2 पाल्यांसाठीच वापरता येईल. इयत्ता 1 ली ते 10 वी मधील विद्यार्थ्यांचे नवीन व नुतनीकरणाचे अर्ज National Scholarship Portal ( NSP 2.0) (www.scholarships.gov.in) या संकेतस्थळावर भरण्याची जबाबदारी संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांची राहील. ( हे अर्ज भरण्याची सोय http://www.minorityaffairs.gov.in या संकेतस्थळावर सुध्दा उपलब्ध् आहे.अर्ज भरताना भ्रमणध्वनी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे हा क्रमांक पालकांचा असेल तर तो 2 पाल्यांसाठीच वापरता येईल, असे अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालक सुनिल चौहान यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading