fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

सौ.अरूणा नाईक डायलिसिस सेंटरमध्ये कोरोना साथीतही अविरत डायलिसीस सेवा

‘लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि पुणे मनपा संयुक्त प्रकल्पाचा पाच वर्षात ३० हजार रुग्णांना लाभ

पुणे, दि. ९ –सौ.अरूणा नाईक डायलिसिस सेंटरमध्ये कोरोना साथीतही अविरत डायलिसीस सेवा सवलतीच्या दरात देण्यात आली. ‘ लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर ट्रस्ट ‘ आणि पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात असणाऱ्या संयुक्त प्रकल्पाचा पाच वर्षात ३० हजार डायलिसिस होऊन रुग्णांना लाभ झाला आहे.

पालिका -स्वयंसेवी संस्था सहभागाचा स्मार्ट सिटी अंतर्गत असलेला पहिला प्रकल्प यशस्वी झाला असल्याची माहिती सेंटरचे विश्वस्त आणि प्रकल्प प्रमुख नितीन नाईक यांनी पत्रकाद्वारे दिली. ही संकल्पना मांडून, प्रत्यक्षात आणून यशस्वी करण्याची कामगिरी नितीन नाईक यांनी पार पाडली .

एका डायलिसिसला येथे औषधांव्यतिरिक्त फक्त 400 खर्च येतो, औषधांसह 950 रुपये खर्च येतो. सर्वसाधारणपणे इतरत्र एका डायलिसिस सेशनसाठी सर्व मिळून 2000 ते 2400 रुपये खर्च असताना या सेंटरमध्ये एकूण 950 रुपयात औषधांसह डायलिसिस केले जाते. एकूण 15 ते 16 जणांची टीम येथे अविरत कार्यरत असते.

लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत पालिकेच्या सहकार्याने कमला नेहरु रुग्णालय येथे डायलिसिस केंद्र सवलतीच्या दरात शहरी गरीब रुग्णांसाठी २०१५ पासून चालवले जाते. पब्लिक -प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर सेवाभावी वृत्तीने चाललेल्या या प्रकल्पात आजवर हजारो रुग्णांनी लाभ घेतला आहे. १ ऑक्टोबर २०१५ रोजी ज्येष्ठ विचारवंत कै. भाई वैद्य व तत्कालीन विधिमंडळ पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते या सेंटरचे उद्घाटन झाले होते.
लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त आणि प्रकल्पप्रमुख नितीन नाईक,ट्रस्टचे विश्वस्त रामदास पन्हाळे , डॉ. संजय भालेराव यांनी हा प्रकल्प यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्वक प्रयत्न केले.
नितीन नाईक यांनी या प्रकल्पाबाबत माहिती दिली .

ते म्हणाले ,’२ ऑकटोबर २०१५ रोजी गांधीजयंती पासून हे डायलिसिस केंद्र सेवाभावी वृत्तीने चालू करण्यात आले . जागा, वीज, पाणी महानगर पालिकेची आणि इतर सर्व यंत्रसामग्री ,संचालन, व्यवस्थापन लायन्स क्लब ऑफ पुणे मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टचे, असा हा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा डायलिसिस सेवेचा पहिला संयुक्त प्रकल्प आहे . पुणे शहरातील हा पहिलाच पथदर्शी प्रकल्प असून तो यशस्वीपणे चालविला जातो . यंत्रसामग्रीसाठी लायन्स क्लब ऑफ पूना मुकुंदनगर चॅरिटेबल ट्रस्टने भांडवली खर्च करून 12 डायलिसिस यंत्रे व इतर लागणारी यंत्र सामुग्री बसवली आहे .तत्कालीन आमदार मोहन जोशी यांच्या निधीतून ३ डायलिसिस मशिन अशी एकंदरीत 15 डायलिसिस यंत्रे बसविण्यात आली. आतापर्यंत ३० हजार डायलिसिस सेशन करण्यात आली आहेत.
त्यातील अडीच हजार पेक्षा जास्त डायलिसिस सेशन कोविड साथीच्या काळात एकही दिवस खंड न पाडता करण्यात आली.

शहरी गरीब योजनेखाली प्रति रुग्ण , प्रति वर्ष १ लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा पालिकेकडून होती . ती नंतर जानेवारी २०१८ मध्ये २ लाख रुपये करण्यात आली . त्यामुळे रुग्णाला वर्ष भरात कोणताही खर्च द्यावा लागत नाही.

कोरोना साथीच्या काळात सेंटरकडून ३० हजार आरसेनिक अल्बम गोळयाचे वाटप रुग्ण, रुग्णाचे नातेवाईक तसेच हॉट स्पॉट झोन मध्ये वाटण्यात आल्या.

सध्य स्थितीत जाणविणाऱ्या तोकड्या आरोग्य सुविधांच्या पार्श्वभूमीवर अशा उपक्रमांचे महत्व सर्व सामान्य नागरिकांसाठी अधिकच आवश्यक वाटते.या सेंटर मध्ये डायलिसिस तंत्रज्ञाना प्रशिक्षण ही देण्यात येते, ज्यामुळे तरुणांना रोजगार संधी मिळत आहे. या मुळे या क्षेत्रात कुशल तंत्रज्ञ यांची उणीव भरून निघत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading