परभणी जिल्हाधिकार्‍यांनी केली बैलगाडीतून नुकसानीची पाहणी

परभणी – पालम तालुक्यातील रावराजुर परिसरातीलअतिवृष्टी व पूर परिस्थितीची पाहणी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी रविवारी (दि.२७) बैलगाडीतुन केली.
पालम तालुक्यातील रावराजुर परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. नदी, नाले ओढ़े पाण्याने वाहत आहेत. याचा फटका परिसरातील शेतकऱ्यांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या नुकसानीचे पाहणी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी थेट शेतावर जाऊन केली. शेतावर जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्याने सर्वत्र चिखल असल्याने गाड्या जात नसल्याने जिल्हाधिकारी मुगळीकर हे बैलगाडीतुन शेतावर पोचले. पालम तालुक्यातील अनेक भागात मोठा पाऊस झाला. या पावसामुळे परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकारी श्री मुगळीकर यांनी रविवारी स्वतः केली. विशेष म्हणजे शेतावर पोचन्यासाठी त्यांनी बैलगाडीत बसून प्रवास केला.
सततच्या पावसामुळे रस्ते चिखलमय झाले आहेत. रस्त्यावरुन चालनेही शक्य होईनासे झाले आहे. तेथे चारचाकी जाने तर दुरच. आशा परिस्थितीत शेतावर जाण्यासाठी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी बैलगाड़ीतुन जाणे पसंद केले.

Leave a Reply

%d bloggers like this: