मिडियम किमातींच्या ‘स्मार्टफोन’ ला ग्राहकांची पसंती

‘इंटरनॅशनल डेटा काॅर्पाेरेशन’ने (आयडीसी) प्रसिद्ध केलेल्या ‘वर्ल्डवाइड क्वार्टरली माेबाइल फाेन ट्रॅकर’ या अहवालानुसार, सध्या खर्च कमी करण्यासाठी ग्राहक कमी ते मध्यम दरांच्या स्मार्टफाेनना पसंती देत आहेत.या वर्षी म्हणजे 2020 मध्ये 73 टक्के ग्राहकांचे प्राधान्य 400 डाॅलरपेक्षा (सुमारे 29 हजार 569 रुपये) कमी किमतीच्या स्मार्टफाेनना असेल, असे या अहवालात म्हटले आहे. 2019 मध्ये स्मार्टफाेनची जागतिक बाजारपेठ 458.5 अब्ज डाॅलरची (सुमारे 3,38,89,33,97,500 रुपये) हाेती. यावर्षी त्यात 7.9 टक्के घट हाेऊन ती 422.4 अब्ज डाॅलरवर (सुमारे 3,12,21,48,4800 रुपये) येण्याचा अंदाज अहवालात व्य्नत करण्यात आला आहे.

स्मार्टफाेनच्या जागतिक बाजारपेठेत कमी ते मध्यम किमतीच्या (शंभर ते चारशे डाॅलरपर्यंत) माेबाइलफाेनचा वाटा सुमारे साठ टक्के आहे. म्हणजे या किमतींच्या फाेनची खरेदी जास्त हाेते. पुढील वर्षीपर्यंत हा वाटा 63 टक्क्यापर्यंत  जाण्याची शक्यता ‘आयडीसी’च्या अहवालात व्य्नत करण्यात आली आहे. ‘वाढती बेराेजगारी आणि राेजगारातील अनिश्चिततेमुळे ग्राहकांचा खरेदीचा पसंतीक्रम बदलला आहे. ते आता परवडू शकणाऱ्या उत्पादनांकडे वळाले आहेत. स्मार्टफाेनच्या बाजारपेठेवरही त्याचा परिणाम झाला असून, कमी ते मध्यम किमतीच्या फाेनना जास्त मागणी आली आहे,’ अशी माहिती ‘आयडीसी’च्या मुख्य विश्लेषक संगीतिका श्रीवास्तव यांनी दिली.

मध्यम ते जास्त वर्गातील फाेनच्या किमती चारशे ते सहाशे डाॅलरपर्यंत (सुमारे 44,349 रुपये) असून, या वर्गातील फाेनचा बाजारातील वाटा 11.6 टक्यांपर्यंत पाेहाेचला आहे. सॅमसंग, हुवेई, तसेच शाओमी, ओप्पाे आणि व्हिव्हाे या कंपन्यांमध्ये या गटात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चुरस सुरू असल्याचे संगीतिका श्रीवास्तव यांनी नमूद केले.या गटात ‘अ‍ॅपल’च्या नव्या ‘आयफाेन-एसई’ या स्मार्टफाेनने प्रवेश केल्यामुळे सर्व कंपन्यांपुढे आव्हान निर्माण झाले आहे. आशिया-प्रशांत (जपान आणि चीन वगळून), लॅटिन अमेरिका, मध्य पूर्व आणि आफ्रिका, तसेच मध्य आणि पूर्व युराेपमध्येही चारशे डाॅलरपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफाेनचा वाटा 83 टक्क्यांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: