कोरोना – राज्यात आज 20 हजार 419 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण तर 23 हजार 644 कोरोनामुक्त, 430 जणांचा मृत्यू

पुणे दिवसभरात १६३७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.- १६९५ रुग्णांना डिस्चार्ज. ६० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.

मुंबई, दि.२६: राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्यांच्या तुलनेत नवीन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी आली आहे. आज दिवसभरात २३ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून २० हजार ४१९ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १० लाख १६ हजार ४५० वर पोहोचली असून राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९४ टक्के एवढे झाले आहे. राज्यभरात सध्या २ लाख ६९ हजार ११९ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २०,४१९ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४३० मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) :

मुंबई मनपा-२२८२ (४४), ठाणे- २५६ (३), ठाणे मनपा-४०१ (८), नवी  मुंबई मनपा-४०३ (९), कल्याण डोंबिवली मनपा-४०८ (२६), उल्हासनगर मनपा-४८, भिवंडी निजामपूर मनपा-३३, मीरा भाईंदर मनपा-१९७ (१०), पालघर-१६३ (२), वसई-विरार मनपा-२१० (१), रायगड-३१८ (६), पनवेल मनपा-२०० (१), नाशिक-४३५ (८), नाशिक मनपा-११६० (९), मालेगाव मनपा-३२ (१), अहमदनगर-५२५ (६),अहमदनगर मनपा-१७२ (२), धुळे-२६, धुळे मनपा-२४, जळगाव-२३८ (९), जळगाव मनपा-११९ (१), नंदूरबार-७९, पुणे- १३९० (२३), पुणे मनपा-१७९६ (६३), पिंपरी चिंचवड मनपा-११३८ (४), सोलापूर-६०१ (१५), सोलापूर मनपा-१०२ (३), सातारा-८४९ (२१), कोल्हापूर-४९५ (२२), कोल्हापूर मनपा-१८३ (५), सांगली-५२४ (२१), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२५५ (७), सिंधुदूर्ग-९६ (२), रत्नागिरी-१४४ (५), औरंगाबाद-१४५ (२),औरंगाबाद मनपा-२४४ (६), जालना-८८ (१), हिंगोली-६७, परभणी-५८ (५), परभणी मनपा-३० (७), लातूर-११७ (२), लातूर मनपा-९७ (२), उस्मानाबाद-२२४ (११), बीड-२०२ (२), नांदेड-१४१ (२), नांदेड मनपा-२१६ (३), अकोला-१८, अकोला मनपा-७५, अमरावती-७० (१), अमरावती मनपा-१२८ (३), यवतमाळ-२८६ (७), बुलढाणा-२०२ (४), वाशिम-५७ (१), नागपूर-५१८ (४), नागपूर मनपा-१११७ (११), वर्धा-२६४ (५), भंडारा-१९२, गोंदिया-२५७, चंद्रपूर-१५५ (३), चंद्रपूर मनपा-१२९ (६), गडचिरोली-९०, इतर राज्य- ३० (५).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ६३ लाख ६९ हजार ६७६ नमुन्यांपैकी १३ लाख २१ हजार १७६ नमुने पॉझिटिव्ह ( २०.७४ टक्के) आले आहेत. राज्यात  १९ लाख  ४५ हजार ७५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३० हजार ५७१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४३० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६६ टक्के एवढा आहे.

पुणे अपडेट २६ सप्टेंबर …….- दिवसभरात १६३७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात १६९५ रुग्णांना डिस्चार्ज.- पुण्यात ६० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २४ रूग्ण पुण्याबाहेरील.- ९३२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५१४ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १४०५८८.- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७६७९.- एकूण मृत्यू -३३३२.-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ११९५७७.- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५५०३.

Leave a Reply

%d bloggers like this: