Wednesday, June 17, 2026
PUNE

माळी ऑनलाइन वधू-वर परिचय मेळावा

पुणे- माळी समाजातील भारतातील  पहिल्या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्याचे रविवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२० रोजी पुण्यातून आयोजन करण्यात आल्याची माहिती मुख्य संयोजक रवि चौधरी यांनी दिली आहे.    

सध्याच्या बदलत्या परिस्थितीत ऑनलाइन वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्याची मागणी समाजातील सर्व स्तरातून केली जात होती, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्यामुळे वेळेसह आर्थिकदृष्ट्या बचत होणार असून त्याचा लाभ समाजाला होणार आहे. अनेक पर्याया मधून आपला मनपसंत जीवनसाथी निवडण्याची सुवर्णसंधी या ऑनलाइन वधू-वर परिचय मेळाव्यातून मिळणार आहे. या ऑनलाइन परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/malivadhuvar या लिंक वर नोंदणी आवश्यक. सहभाग घेण्याची अंतिम दिनांक ६ ऑक्टोबर २०२०  आहे. झूम अॅप व रिश्ते धागे अॅपच्या (Android Mobile व Rishte Dhage App द्वारा वन टू वन Zoom मिटिंग) माध्यमातून ऑनलाइन संवाद साधण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील विविध माळी वधू-वर सूचक मंडळांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. मा आ कमलताई ढोलेपाटील, बाळासाहेब शिवरकर,दिपक कुदळे व श्रीकांत लखोटिया यांचे मार्गदर्शन आहे.     ऑनलाइन अधिक माहितीसाठी संपर्क: संगीता जमदाडे-94220 24924, संगीता अंत्रे-88308 73287,  संतोष रासकर – 93258 06766.   समाजातील सर्व थरातील व घटस्फोटीत विवाह इच्छुकांना नोंदणी नंतर सर्वाना प्रशिक्षण दिले जाणार आहे. तरी समाजातील इच्छुकांची या सुविधेचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन मुख्य संयोजक रवि चौधरी, पुणे (फोन-9922431974 / 9822435090) यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading