राज्यात आज 32 हजार रुग्ण कोरोना मुक्त; 344 जणांचा मृत्यू

मुंबई, दि. 21 – राज्यात आज 15 हजार 738 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर 344 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब अशी की याच काळात 32 हजार 7 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत राज्यातील एकूण कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 12,24,380 इतकी झाली आहे. यात उपचार घेऊन बरे वाटत असलेल्या आणि प्रकृती सुधारल्यामुळे रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेल्या 9,16,348 जणांसह प्रत्यक्ष उपचार सुरु असलेल्या 2,74,623 रुग्णांचाही समावेश आहे. तसेच एकूण संक्रमितांपैकी आतापर्यंत 33 हजार 15 नागरिकांचा कोरोना व्हायरस संसर्गामुळे मृत्यू झाल्याचेही आरोग्य विभागाने सांगितले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे की, राज्यातील कोरना व्हायरस संक्रमित रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण (रिकवरी रेट) 74.84% इतका आहे. तर, मृत्यू दर अवघा 2.7% इतका आहे. कोरोना व्हायरस चाचणीसाठी आतापर्यंत 59,12,258 इतके नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 12,24,380 जणाची कोरना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली.कोरोना व्हायरस संसर्गाचा राज्यातील सरासरी दर हा 20.71% इतका राहिला आहे. राज्यात आतापर्यंत 18,58,924 इतके नागरिक होम क्वारंटीन आहेत. तर, 35,517 जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: