दुकाने आणि व्यापारी आस्थापनांनी नव्या नियमांचे पालन करावे, व्यापार मंडल चे आवाहन

पुणे, दि. २० – पुण्यामध्ये कोरोना संकट वाढत असताना प्रशासनाच्या नव्या नियमांनुसार गर्दीचे नियमन करावे आणि कारवाई ओढवून घेऊ नये ,प्रशासनाला सहकार्य करावे ,असे आवाहन ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया व्यापार मंडल’ चे प्रदेशाध्यक्ष विजयसिंह डुबल यांनी केले आहे. पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हे आवाहन केले आहे .

दुकाने आणि व्यापारी आस्थापनांमध्ये गर्दीचे नियमन न केल्यामुळे, सोशल डिस्टंसिंग ची सुरक्षा न पाळल्याने काही दुकानांवर प्रशासनाने कारवाई केली आहे. लॉक डाउन नंतर नुकतेच व्यवसायाने उभारी भरलेली असताना सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष होणार नाही ,याची खबरदारी व्यापारी व्यावसायिक आणि उद्योजकांनी घ्यावी असे आवाहन विजयसिंह डुबल यांनी या पत्रकात केले आहे .व्यापार मंडल चे संपूर्ण सहकार्य प्रशासनाला राहील असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: