Saturday, June 20, 2026
MAHARASHTRATOP NEWS

पोलीस अधिकाऱ्यांकडून ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न – अनिल देशमुख

मुंबई, दि. 20 – राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांकडून ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. लोकमत ऑनलाईनच्या ‘ग्राऊंट झिरो’ या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. तसेच याप्रकरणाबाबत जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नसून त्या अधिकाऱ्यांविषयी अनिल देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

माहितीनुसार, चार ते पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीच्या सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा समावेश होता. आमदारांना धमकावणे, तुम्ही राजनामे द्या, असे सांगणे, तुमच्या फायली आमच्याकडे आहे, अशी विधाने करणे, असे काही प्रकार समोर आले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी यामध्ये हस्तक्षेप केला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि अनिल देशमुख यांच्यात चर्चा झाली. मग यानंतर हे प्रकरण योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात आलं, अशी माहिती समोर आल्याचं वृत्त लोकमतने प्रसिद्ध केलं आहे.

याप्रकरणात कोण कोण सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही कसं थांबवलं असा थेट प्रश्न विचारला असता गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, ‘याप्रकरणाबाबत मला काही एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करत आहेत. पोलीस दलात असेही अधिकारी असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याबाबत मी जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही.’

दरम्यान एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन शरद पवार यांनी त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरे काम द्या, असे सांगत अन्य चार अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती, असे एका नेत्याने स्पष्ट केले. हा सगळा प्रकार लक्षात येत्याच तो वेळीच थांबवला गेला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading