कोरोना – आज २६ हजार एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे; २० हजार ५९८ नवीन रुग्णांचे निदान तर ४५५ जणांचा मृत्यू

पुण्यात दिवसभरात १७०० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ तर कल्याण येथे १०६ वर्षांच्या आजीबाई कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या

मुंबई, दि.२० : राज्यात आज सलग तिसऱ्या दिवशी २६ हजार ४०८ एवढ्या उच्चांकी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २० हजार ५९८ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ८४ हजार ३४१ वर पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९१ हजार २३८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

दरम्यान, जालन्याच्या १०७ वर्षीय आजीबाईंच्या पाठोपाठ आज कल्याण येथे १०६ वर्षांच्या आजीबाईही कोरोनाला हरवत ठणठणीत बऱ्या झाल्या आहेत. त्यांच्यावर कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या डोंबिवली येथील जम्बो रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनामुक्त झालेल्या आजीबाई रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभार मानत ‘आनंदी’ चेहऱ्याने घरी परतल्या.

आज निदान झालेले २०,५९८ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ४५५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२०९ (४४), ठाणे- ३१३ (५), ठाणे मनपा-४०४ (६), नवी  मुंबई मनपा-३६२ (८), कल्याण डोंबिवली मनपा-४७८ (१४), उल्हासनगर मनपा-६५ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (४), मीरा भाईंदर मनपा-२०४ (५), पालघर-१८४ (१), वसई-विरार मनपा-२६७ (३), रायगड-४१४ (६), पनवेल मनपा-२७१ (२), नाशिक-२५८ (९), नाशिक मनपा-६२० (४), मालेगाव मनपा-४३, अहमदनगर-६७८ (१४),अहमदनगर मनपा-२११ (२), धुळे-६४ (१३), धुळे मनपा-२७(८), जळगाव-६९२ (७), जळगाव मनपा-१४८ (५), नंदूरबार-११२, पुणे- १२२० (२९), पुणे मनपा-१७७४ (३७), पिंपरी चिंचवड मनपा-७३२ (१०), सोलापूर-६१६ (५), सोलापूर मनपा-८१ (१), सातारा-७७० (१४), कोल्हापूर-५५३ (८), कोल्हापूर मनपा-१८१ (३), सांगली-५२४ (१२), सांगली  मिरज कुपवाड मनपा-३२१ (४), सिंधुदूर्ग-४५, रत्नागिरी-८३ (२२), औरंगाबाद-९१ (१६),औरंगाबाद मनपा-३९७ (५), जालना-१०९ (१), हिंगोली-८८ (१), परभणी-४६ (१), परभणी मनपा-४१ (१), लातूर-२२२ (१३), लातूर मनपा-११८ (५), उस्मानाबाद-१२२ (१७), बीड-१७१ (६), नांदेड-१५८ (२), नांदेड मनपा-२७७ (१), अकोला-३७ (१), अकोला मनपा-१०१ , अमरावती-८८ (४), अमरावती मनपा-१५२ (१), यवतमाळ-२७० (१), बुलढाणा-१९४ (१), वाशिम-१२० (१), नागपूर-५३५ (१९), नागपूर मनपा-१६१२ (३५), वर्धा-१३८ (१), भंडारा-१५० (९), गोंदिया-२२४ (१), चंद्रपूर-१४३ (२), चंद्रपूर मनपा-५५, गडचिरोली-५५ (३), इतर राज्य- २२ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५८ लाख ७२ हजार २४१ नमुन्यांपैकी १२ लाख ८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५८ टक्के) आले आहेत. राज्यात  १८ लाख  ४९ हजार २१७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३५ हजार ६४४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४५५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७ टक्के एवढा आहे.

पुणे शहर २० सप्टेंबर …….- दिवसभरात १७०० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.- दिवसभरात १५४५ रुग्णांना डिस्चार्ज.- पुण्यात ५० करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १२ रूग्ण पुण्याबाहेरील.- ९६१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४६७  रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.- पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १३१७८१.- पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७७८१.- एकूण मृत्यू -३०८४.-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- ११०९१६.- आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६०६७.

Leave a Reply

%d bloggers like this: