गरिबांसाठी मोफत अन्न योजनेसाठी देखरेख आणि जनजागृती अभियान

लोकजनशक्ती पार्टीची घोषणा

पुणे, दि. 15 – प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत मार्च मध्ये जाहीर केलेली ३ महिन्याच्या आणि जुलै मध्ये जाहीर पाच महिन्याच्या मोफत धान्य वाटपासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे का हे पाहण्यासाठी आणि गरीबांपर्यंत धान्य पोहोचत आहे की नाही याची देखरेख करण्यासाठी ‘जनजागृती आणि देखरेख अभियान ‘ सुरु करण्याची घोषणा लोकजनशक्ती पार्टी ने केली आहे . जनजागृती करून लाभार्थीना घरपोच धान्य अथवा जवळच्या सेंटर मधून धान्य वाटप करण्याची व्यवस्था करावी, उत्पन्नाची अट रद्द करावी ,अशी पार्टीने मागणी लोकजनशक्ती पार्टीने आज पत्रकाद्वारे केली आहे.
पुणे शहर जिल्हाध्यक्ष संजय आल्हाट,पुणे शहर जिल्हा उपाध्यक्ष संजय चव्हाण यांनी ही माहिती दिली .अल्हाट यांच्यासह संजय चव्हाण , प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे,प्रवक्ते के.सी.पवार,आदिनाथ भाकरे यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.पार्टीचे अध्यक्ष राम विलास पासवान हे केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री असल्याने या योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी,यासाठी पार्टीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत .

टाळेबंदीच्या काळात या योजनेअंतर्गत सुरुवातीस तीन महिने लाभधारकांना ही योजना योग्य पध्दतीने न समजल्याने व त्याची लॉकडाऊन काळात जनजागृती न झाल्याने धान्य वाटपात मोठया प्रमाणात अनियमितता व काळाबाजार झाल्याची चर्चा आहे. जुलै मध्ये या योजनेस मुदतवाढ मिळाली . रेशनकार्ड धारक आणि दुकानदार यांच्यामधील उडालेले खटके यामुळे ही योजना राबविण्याच्या पद्धती बाबत संशय बळावतो आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे पुढील पाच महिने मोफत धान्य वितरणासाठी आपल्या मार्गदर्शनाखाली लाभधारकांना घरपोच योजना राबवावी. अथवा प्रत्येक विभागात धान्याचे सेंटर उभी करावीत.हे सेंटर परिमंडळातील प्रत्येक विभागतील शाळेमध्ये सिसिटीव्हीच्या निगराणीखाली उभारावे. रेशनिंग कार्ड पाहुन त्याची योग्य ती नोंद केल्याची पावती देवून ही योजना राबवावी,अशी मागणी प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे. ही योजना पारदर्शक पध्दतीने राबविली जाईल.कोणत्याही प्रकारच्या काळाबाजारास वाव देऊ नये.मार्च मध्ये जाहीर केलेले धान्य पूर्ण पणे वितरीत झालेले नाही आणि जुलै पासून जाहीर झालेले धान्य कोटा उचलला गेलेला आहे ,मात्र ,त्याच्या वितरणाची पार्टीकडून माहिती घेतली जाणार आहे .

या योजनेच्या अमंलबजावणीवर सामाजिक कार्यकर्तेही आपआपल्या परीने सहकार्य करतील. या योजनेचा गरजूंना लाभ होवून कोणीही अन्नधान्यापासून वंचित राहणार नाहीत, अशी काळजी घ्यावी, योजनेच्या अंमलबजावणी बाबत कोणाही विषयी तक्रार असल्यास लोकजनशक्ती पुणे कार्यालय ०२० २६११४८४९ ,संजय अल्हाट यांच्याशी ९३२५७७११७७,अशोक कांबळे ८२६३८०५६४५ ,संजय चव्हाण ९११२३३५०२३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा ,असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: