Monday, June 15, 2026
BusinessNATIONAL

135 देशांच्या ‘जीडीपी’पेक्षा अ‍ॅमेझाॅनची जास्त कमाई

जेफ बेझाेस यांची संपत्ती आता 204 अब्ज डाॅलरवर!

नवी दिल्ली – काेराेना महामारीमुळे भल्या भल्यांच्या नाकात दम आणलेला असताना एक व्यक्ती मात्र अफाट कमाई करत आहे. ‘अ‍ॅमेझाॅन’चे संस्थापक जेफ बेझाेस ही ती व्यक्ती असून, त्यांच्या कमाईचे आकडे डाेळे दिपविणारे आहेत.
काेराेना महामारीमुळे अनेक देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा (जीडीपी) बेझाेस यांनी मिळविलेली रक्कम जास्त आहे. सध्या त्यांची संपत्ती आहे 204.6 अब्ज डाॅलर (सुमारे 149 लाख काेटी रुपये)! हा आकडा आपल्या रुपयांत लिहिणेसुद्धा अवघड आहे.
200 अब्ज डाॅलरपेक्षा जास्त कमाई केलेले ते जगातील पहिले श्रीमंत आहेत. ‘अ‍ॅमेझाॅन’च्या शेअरमध्ये आलेल्या तेजीमुळे बेझाेस यांची संपत्ती गांबिया, अँटिग्वा, साेमालिया आणि सेंट किट्स यासह अनेक देशांच्या ‘जीडीपी’पेक्षा जास्त झाली आहे. या वर्षीच्या (2020) प्रारंभी ‘अ‍ॅमेझाॅन’च्या शेअर्सनी 80 टक्के उसळी घेतल्यामुळे बेझाेस यांच्या संपत्तीमध्ये 86 अब्ज डाॅलरची वाढ झाली आहे. या कमाईचा हिशाेब करावयाचा झाल्यास, या वर्षीच्या आठ महिन्यांत बेझाेस यांनी दर तासाला 110 काेटी रुपयांची कमाई केली आहे. जेफ बेझाेस हे 2017 मध्येच 100 अब्ज डाॅलरची कमाई करणाऱ्या अतिश्रीमंतांच्या गटात दाखल झाले आहेत. पत्नीबराेबर घटस्फाेट झाला नसता, तर एव्हाना बेझाेस यांची संपत्ती 300 अब्ज डाॅलर झाली असती. यंदाच्या जानेवारीत त्यांची संपत्ती 114 अब्ज डाॅलरवर गेली हाेती. 2026 पर्यंत त्यांची संपत्ती एक हजार अब्ज डाॅलरवर जाण्याचा अंदाज आह

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading