Wednesday, September 2, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांना कॉँग्रेसचे खुल्या चर्चेचे आव्हान….!

 

 

काँग्रेस’ला जशास तसे उत्तर नंतर द्या, अगोदर जनतेच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे द्या ..!
‘जनतेप्रती उत्तरदायीत्वाला बगल देत, विरोधीपक्ष नेते राहुल गांधी व काँग्रेस’वर टिका करण्यातच् भाजप’नेतृत्व धन्यता मानतात.. हे भरकटल्याचे लक्षण .. !!
– प्रदेश कॉँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांची प्रखर टिका

पुणे  :
भारतीय जनता पक्षाची पुण्यामध्ये प्रदेश कार्यकारणीची बैठक झाली यामध्ये पुण्याच्या किंवा महाराष्ट्राच्या समस्यांबद्दल बोलण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर भाजपच्या नेतेमंडळींनी काँग्रेस आणि विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्यावरच गरळ ओकत टीका केली. भाजपाला जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी केवळ राहुल गांधी दिसत आहेत. राहुल गांधी यांना विद्यार्थी वर्गाचा मिळणारा वाढता पाठिंबा पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून, भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा सत्तेचा राजधर्म निभवावा व राज्यापुढील ज्वलंत प्रश्नांकडे प्रथम लक्ष द्यावे, अशी टीका काँग्रेसचे वरिष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळ दादा तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केली.

गोपाळदादा तिवारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते आणि धोरणांवर टीका केली. यावेळी जेष्ठ काँग्रेसजन सुभाष थोरवे, पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे, एनएसयुआय’चे सिद्धार्थ जांभुळकर, साहेबराव क्षीरसागर, अनुसूचित जाती विभागाचे शहराध्यक्ष कुणाल राजगुरू, सरचिटणीस घनश्याम निकम, नंदकूमार पापळ, इ उपस्थित होते.

गोपाळदादा तिवारी पुढे म्हणाले,
की, भारतीय जनता पक्षाने घेतलेला प्रदेश कार्यकारणी मध्ये जनतेच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी त्यांनी केवळ काँग्रेस आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यातच धन्यता मानली. ज्या पुण्यामध्ये कार्यकारिणीची बैठक होत आहे त्या ठिकाणी ऐरणीवर वर आलेला गणेशोत्सव डीजे च्या प्रश्नासानदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी केवळ उंटावरून शेळ्या हाकल्या व कोणताही ठोस निर्णय सांगितला नाही केवळ पुणे करांनी डीजे स्पीकर इ बाबत वाद न घालता उत्सव साजरा करावा हा अजीब सल्ला दिला..!
गणेशोत्सव’बाबत सरकारने केवळ
राज्यमहोत्वाची जाहिरात बाजी न करता,
‘राज्य महोत्सव’ बाबत किमान यंदा तरी ‘जीआर’ (गॅझेट) काढून, गणेशोत्सव बाबत आचारसंहिता, स्पीकर, वाद्य पथके, सार्व वाहतूक, मेट्रो इ बाबत निश्चित वेळापत्रक वा नियमावली व सवलती इ बाबत निश्चित धोरण जाहीर करण्याची मागणी देखील केली.

काँग्रेसने आपली विचारधारा कधीही सोडलेले नाही. काँग्रेसच्या विचारधारेवरच देश स्वतंत्र झाला आहे त्यामुळेच काँग्रेसला देशाची काळजी आणि जनतेच्या प्रश्नांसंदर्भात तळमळ वाटत आहे . परंतु भारतीय जनता पक्षाला २४ तास केवळ राजकारण करायचे आहे त्यामुळे यांनी हजारो कोटी रुपये खर्च करून राहुल गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला. परंतु जेन झी ने छात्रो  की गुंज या कार्यक्रमांमध्ये राहुल गांधी यांना दिलेल्या प्रतिसादामुळे त्यांचा हा प्रयत्न विफल झालेला दिसतो. राहुल गांधी यांना तरुणांचा वाढता पाठिंबा मिळत आहे.
२०१४ ते २०२४ चा अनुभव घेऊनच जनतेने, लोकसभेमध्ये काँग्रेसच्या शंभर टक्के जागा वाढवून १०२ केल्या, मात्र दूसऱ्या बाजूला भाजपाच्या संसदेतील सु ३३% जागा कमी झाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीस १७ व मविआ’स ३१ जागा मिळाल्या यांचे किमान भान तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठेवावे.. असा टोला ही लगावला.

महिला आरक्षण विधेयकावरून भाजपकडून कॉँग्रेसला लक्ष्य केले जात आहे, यावर बोलताना तिवारी यांनी सांगितले की, महिला आरक्षण कॉँग्रेसनेच आणले आहे त्यामुळेच किमान स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ३३% आरक्षण मिळाले आहे. काँग्रेस महीला आरक्षण विरोधी असल्याचा भ्रामक दावे करण्यापेक्षा ही फडणवीस यांनी कोणत्याही व्यासपीठावर चर्चेस येण्याचे आव्हान ही प्रदेश काँग्रेस चे वरीष्ठ राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
भाजपला, सत्ता टिकवण्यासाठी संसदेत जागा वाढवून हव्यात हा हेतू सफल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांच्या पंदामुळे त्यांची तथ्यहीन विधाने देखील छापुन येतात.
जनतेच्या प्रश्नांसंदर्भात सत्ताधार्यांना देणे घेणे नाही.
भाजपाचे मूळ विचारसरणी असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत अमेरिकेमध्ये गेल्यानंतर भारतीयांमध्ये विविधतेत एकतेचा डीएनए, हिंदू इतर धर्मियांचे विरोधी नाही तसेच सर्वधर्म समभाव इ गप्पा मारतात, परंतु देशामध्ये मात्र हिंदू -मुस्लिम राजकारण करतात ही त्यांची दुटप्पी भूमिका जनता ओळखून आहे आणि यामुळेच जनता भाजपाला येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवेल गोपाळदादा तिवारी यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading