Sunday, June 21, 2026
PUNETOP NEWS

मिशन बिगीन अगेन बाबत अधिसूचना जाहीर – जिल्हाधिकारी डॉ.देशमुख

पुणे दि.3 : – कोविड-19 विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव झपाटयाने वाढत असल्याने आपत्कालीन उपाय योजनेचा भाग म्हणून मुख्य सचिवांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रात लॉकडाऊनची घोषणा यापूर्वी केलेली असून, त्यास 30 सप्टेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. तसेच टप्पे निहाय लॉकडाऊन समाप्त करणे आणि निर्बंध कमी करण्यासाठी ‘ मिशन बिगीन अगेन’ बाबत अधिसूचना जाहीर केलेली आहे. दि. 31 ऑगस्ट 2020 पर्यंत महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी दिलेली मार्गदर्शक तत्वे व अधिसूचनेतील परिशिष्ठ 1,2 व 3 मध्ये नमूदु केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी शासन अधिसूचना जारी करण्यात आलेली असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी कळविले आहे.
ही शासन अधिसूचना पुणे जिल्हा कार्यक्षेत्रात लागू करण्यात आली आहे. त्यानुसार हे आदेश 1 सप्टेंबर 2020 ते 30 सप्टेंबर 2020 पर्यंत लागू राहतील आणि सर्व संबंधित प्रशासकीय विभाग यांनी या आदेशाची अंमलबजावणी करावी. त्यानुसार पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये पुणे महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पुणे महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. पिंपरी – चिंचवड महानगरपालिका हद्दीत आयुक्त, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून महानगरपालिका हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. पुणे व खडकी छावणी परिषद क्षेत्र पुणे महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त्, महानगरपालिका पुणे यांच्या आदेशातील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी,पुणे व खडकी छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील. देहूरोड छावणी परिषद क्षेत्र पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीजवळ येत असल्याने आयुक्त महानगरपालिका, पिंपरी चिंचवड यांच्या आदेशातील व मुख्य कार्यकारी अधिकारी, देहूरोड छावणी परिषद यांच्या आदेशातील अटी व शर्तींच्या अधिन राहून छावणी परिषद हद्दीतील सर्व उपक्रम व कृतींना परवानगी राहील.
याप्रमाणे क्षेत्र वगळता जिल्हयाचे उर्वरित सर्व क्षेत्र ग्रामपंचायत, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत हद्दीत मुख्य सचिव यांच्याकडील अधिसूचनेत परवानगी देण्यात आलेल्या सर्व उपक्रम व कृतींना अधिसूचनेतील अटी व शर्तींच्या अधिन राहून परवानगी राहील, असे जिल्हाधिकारी डॉ.देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
या आदेशाचा भंग करणा-या कोणत्याही व्यक्ती, संस्था आणि संघटना यांनी उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय साथ अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीलय दंड संहिताचे कलम 188 आणि या संदर्भांतील शासनाचे प्रचलित इतर अधिनियम व नियम अन्वये योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेश देशमुख यांनी दिले आहे.
0 0 0 0

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading