fbpx
Thursday, April 25, 2024
PUNE

आयएएचव्ही आणि आर्ट आॅफ लिव्हिंगचा पुणे महापालिकेतर्फे विशेष सन्मान

पुणे : कोरोना महामारीच्या संकटकाळात पुण्यात मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करणा-या इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूज, आर्ट आॅफ लिव्हिंगचा विशेष सन्मान पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आर्ट आॅफ लिव्हिंचे महाराष्ट्राचे अ‍ॅपेक्स मेंबर शेखर मुंदडा आणि आयएएचव्हीचे प्रतिनिधी आदित्य जोशी यांनी सन्मान स्विकारला.

यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्र्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूजच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या बाणेर येथे नव्याने बांधलेल्या कोविड केअर विशेष रुग्णालयात १० व्हेंटिलेटर देण्यात आले. तसेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल ६ कोटींची वैद्यकीय उपकरणे, आॅक्सिजन पाईपलाईन, बेड्स, अन्न, अन्नधान्य, स्कॅनर, मास्क, पीपीई किट, फेस शील्ड देण्यात आली आहेत. आर्ट आॅफ लिव्हींगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाने आणि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूज महाराष्ट्र प्रमुख रमेश रमन व अध्यक्ष दर्शक हाथी यांचे सहाय्य या कार्यासाठी मिळाले. सीएसआरच्या माध्यमातून ही मदत उभी करण्यात आली. महापौर मुरलीधर मोहोळ आणि अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या विनंतीवरुन ही मदत करण्यात आली.
शेखर मुंदडा म्हणाले, इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ ह्युमन व्हॅल्यूजच्या सहाय्याने पुण्यामध्ये कोविड १९ च्या पार्श्वभूमीवर २००० पीपीई किट्स, २००० फेस शिल्ड, २००० एन ९५ मास्क, ७ स्वॅब बूथ, ३०० थर्मामीटर, १५० पल्स आॅक्सिमीटर, ५०० इम्यूनिटी बूस्टर ड्रॉप्स आदी मदत देण्यात आली.
आदित्य जोशी म्हणाले, कंटेनमेंट झोनसाठी १० हजार रेशन किट, २००० नाडी आॅक्सिमीटर, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या पोलिसांसाठी २५ हजार मास्क, ८ लाखांची ३ एचएफएनसी मशीन, कोविड केअर सेंटरसाठी १६०० बेड आजपर्यंत देण्यात आले आहेत. याशिवाय इतर वैद्यकीय उपकरणे नायडू रूग्णालयात संस्थेच्या वतीने पुरविण्यात येत आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading