काशी कापडी पुरम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सेवाधाम वृद्धाश्रमाला मदत
पुणे : काशी कापडी समाजाच्या काशी कापडी पुरम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. उत्सवाचा खर्च टाळून गोळेवाड़ी सिंहगड पायथा येथील सेवाधाम वृद्धाश्रमाला रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तू सुपूर्द करण्यात आल्या. संस्थेच्या संचालिका लेफ्टनंट डॉ.प्रतिभा पायगुडे यांच्याकडे मदत देण्यात आली.
यावेळी युवा नेते शैलेश दिलीप वेडेपाटील, काशी कापडी पुरम सोसायटीमधील सुरेश भिंगारे, सुधीर कर्पेकर, यशवंत कुंदर, अरुण भिंगारकर, मनोज पिंगळे , राकेश वाडेकर, राहुल आंदेकर, जगदीश कोलेकर, मयुर कर्पेकर, प्रशांत इंदपुरकार, सागर गादेकर, अतुल भिंगारकर उपस्थित होते.
लेफ्टनंट डॉ.प्रतिभा पायगुडे म्हणाल्या, कोरोनाच्या संकटामुळे आमच्या वृद्धाश्रमावर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यात काशी कापडी पुरम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. संकट काळात साधेपणाने उत्सव होऊ शकतो हे दाखवून एक आदर्श निर्माण केला आहे, असेही त्यांनी सांगितले.
अतुल भिंगारकर म्हणाले, गणेशोत्सव काळात मागील वर्षी अन्नदान करण्यात आले होते. विसर्जन मिरवणूक ही मोठ्या उत्साहात काढण्यात आली होती. परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे उत्सव साधेपणाने साजरा करीत सेवाधाम वृद्धाश्रमाला मदत करण्यात आली आहे.
