fbpx
Monday, June 17, 2024
BusinessTECHNOLOGY

हंगामा प्ले’च्या प्रीमिअम लायब्ररीचा आनंद आता घ्या तोशिबा 4 के स्मार्ट टीव्हीवर

हंगामा डिजीटल मीडियाचा अग्रगण्य व्हीडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्म हंगामा प्ले’च्या व्हीडिओ लायब्ररीची मजा तोशिबा 4 के स्मार्ट टीव्हीवर घेता येईल. हंगामा प्ले अॅप भारत आणि जगभरातील सर्व तोशिबा 4के स्मार्ट टीव्हीवर प्री-इंस्टॉल होईल. यामुळे उपभोक्त्यांना 5000 हून अधिक इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांचे सिनेमे, ओरीजनल शो, 1500 पेक्षा अधिक लघुपट, विविध भाषांमधील 7500+ तासांचा किड्स अँड टेलिव्हिजन कंटेंट आणि त्यावर संगीत, फिल्म, गॉसिप, विनोद, आध्यात्मिक इ. विषयांवरील 150,000 हून अधिक लघु-प्रकारातील व्हीडिओंची मजा घेता येईल.

जपानमध्ये डिझाईन करण्यात आलेला आणि मेड इन इंडिया असलेल्या तोशिबा’च्या 4के स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये डॉल्बी व्हिजन, डॉल्बी अॅटमॉस, विडा (VIDAA) ऑपरेटींग सिस्टीम आणि वापरकर्त्यांना अद्वितीय टीव्ही अनुभव देणारी प्रीमियम डिझाईन आहे. त्यांनी अलीकडे 7 वेगवेगळी टेलिव्हिजन मॉडेल लॉन्च केली असून त्यांची किंमत रु. 12,990 ते रु. 66,990 दरम्यान आहे. L50 सिरीज 43-इंच वेरीयंटमध्ये येते, जे पूर्ण एचडी रेझोल्यूशन देते तर 32 इंच एचडी रेझोल्यूशनमध्ये येते. U50 हे युएचडी सिरीजमधील असून याद्वारे अस्सल, अधिक जिवंत स्वरुपाची छायाचित्रे पाहता येतात. ही उत्पादने 43-इंच, 50-इंच आणि 55-इंच स्क्रीन वेरीयंटमध्ये उपलब्ध आहेत. U79 ही प्रीमियम युएचडी सिरीज असून 55 इंच आणि 65 इंच प्रकारात मिळतात. दोन्ही U50 आणि U79 मध्ये 4के रेझोल्यूशन+ टेक्नोलॉजी समाविष्ट आहे, त्यात इतर वैशिष्ट्ये, सामान्य एफएचडी कंटेंट अल्ट्रा एचडी 4के गुणवत्तेत परावर्तित करण्यास साह्य करतात. याद्वारे प्रेक्षकांना 4के प्रमाणे गुणवत्ता त्यांच्या सेट-टॉप बॉक्सवर पाहणे शक्य होते. तोशिबा 4K स्मार्ट टीव्ही अमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजीटल आणि टाटा क्लिकवरून देखील खरेदी करता येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना हंगामा डिजीटल मीडियाचे सीओओ सिद्धार्थ रॉय म्हणाले की, “भारतात कनेक्टींग स्मार्ट टीव्हीचा स्वीकार झपाट्याने दरवर्षी 2 ते 2.5x या वेगाने वाढतो आहे. हंगामा प्ले’वर देखील 2019 पासून स्मार्ट टीव्हीचा वापर 2.8x ने वाढलेला दिसतो. आगामी तीन वर्षांत हा आकडा दुप्पट होण्याची शक्यता आहे. आम्ही विडा (VIDAA)  करिता तोशिबासोबतच्या भागीदारीबद्दल आनंदी आहोत. या तंत्रामुळे वापरकर्त्यांना लायब्ररीमधील विविध-प्रकारच्या भाषा आणि कंटेंटला एक्सेस मिळतो. तोशिबा’च्या 4के स्मार्ट टीव्हीवर आमचा महत्त्वपूर्ण कंटेंट पाहण्याचा अनुभव उपभोक्त्यांना नक्कीच समृद्ध करणारा ठरेल.”

“जगात भारताची बाजारपेठ ही स्मार्ट टीव्हीकरिता मोक्याची ठरली असून खरेदीत झपाट्याने वाढ होते आहे. विडा (VIDAA)  साठी ही एक महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते. मात्र भौगोलिकता, भाषेच्या दृष्टीने ही बाजरपेठ गुंतागुंतीची समजली जाते. यावरील उच्चतम गुणवत्तेच्या स्थानिक मजकुराचे भरगच्च आऊटपूट, तसेच स्थानिक बाजाराची गरज लक्षात घेऊन तयार करण्यात आलेले पर्याय उपलब्ध आहेत. आमच्यासाठी हंगामा एक अद्वितीय जोडीदार ठरतो आहे. तो आम्हाला आमच्या मंचावर चांगला कंटेंट उपलब्ध करून देत नाही, तर भारतीय बाजारांमध्ये आमच्या विस्तारीत प्रयत्नांना पाठबळही पुरवतो,” असे उद्‍गार VIDAA स्मार्ट ओएसचे ईव्हीपी ऑफ बिझनेस गाय इड्री यांनी काढले.

युएसए दरम्यान असलेल्या व्यवहाराद्वारे ओपन Vidaa स्मार्ट टीव्ही ऑपरेटींग सिस्टीम (ओएस) आणि हंगामा डिजीटल मीडिया एन्टरटेनमेंट भागीदारीमुळे हंगामा प्ले हा विडा (VIDAA)  ओएसकरिता स्ट्रॅटेजिक स्ट्रिमिंग पार्टनर बनला आहे. मार्च महिन्याच्या उत्तरार्धात विडा (VIDAA)  ने जगात 4.0 नावाने पूर्णपणे नवीन आणि वेगळा युझर इंटरफेस दाखल करण्यात आला. नवीन U4 सपोर्ट नैसर्गिक पद्धतीने मोठ्या स्क्रीनवर लोकांसमवेत संवाद साधणार असून यावेळी अॅप्लिकेशन आणि तंत्रज्ञानापेक्षा कंटेंट आणि सेवा यावर अधिक भर दिसून येतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading