fbpx
Monday, June 17, 2024
LIFESTYLE

सध्‍याच्‍या अवघड काळात दररोज मूठभर बदामांचे सेवन करत आरोग्‍यदायी जीवनशैली अंगिकारा!

जगभरातील, विशेषत: भारतातील लोक कोविड-१९ महामारी दरम्‍यान नवीन नियमांशी जुळवून घेण्‍याचा प्रयत्‍न करत असताना आल्‍मंड बोर्ड कॅलिफोर्नियाने आज ‘महामारी दरम्‍यान कुटुंबाचे आरोग्‍य व पोषणाची खात्री घेण्‍याचे महत्त्व’या विषयावर एका सत्राचे आयोजन केले. या सत्रामध्‍ये देशातील सध्‍याच्‍या आरोग्‍य स्थितीबाबत चर्चा करण्‍यात आली आणि कुटुंबं त्‍यांचे दैनंदिन आहार व जीवनशैलीमध्‍ये समाविष्‍ट करू शकतील असे प्रतिबंधात्‍मक उपाय सांगितले. सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे, पोषण व स्‍वास्‍थ्‍य सल्‍लागार शीला कृष्‍णास्‍वामी यांनी सत्राचे नेतृत्‍व केले.

संपूर्ण सत्रादरम्‍यान उर्मिला व शीला यांनी त्‍यांच्‍या वैयक्तिक जीवनांमधील उदाहरणे व मते सांगितली आणि भारतभरातील कुटुंबांना महामारीदरम्‍यान त्‍यांची जीवनशैली व आहार सवयींवर विशेष लक्ष देण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले. लॉकडाऊनदरम्‍यान बाहेरील वावर व शारीरिक व्‍यायाम कमी झाल्‍यामुळे पालक आणि मुलांमध्‍ये तणाव व अस्‍ताव्‍यस्‍त वेळापत्रकाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक मुले घरातूनच ऑनलाइन शालेय शिक्षण घेत असल्‍यामुळे या सत्रामध्‍ये मुलांसाठी आहाराच्‍या सवयी व जीवनशैलीमधील बदल यावर देखील विशेष लक्ष देण्‍यात आले. याव्‍यतिरिक्‍त या सत्राने पालक, मुले किंवा वृद्ध अशा कुटुंबातील सर्व सदस्‍यांना पौष्टिक आहार सेवन करणे, व्‍यायाम करणे आणि बदामांसारख्या प्रतिकारशक्ती वाढवण्‍यास मदत करणा-या घटकांचा समावेश असलेला योग्‍य अल्‍पोपहार सेवन करण्‍याची सवय अंगिकारणे यांचे महत्त्व देखील दाखवले. याबाबतील अति‍थींनी काही बदल करण्‍याचा सल्‍ला दिला. कुटुंब हे बदल रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी, सुरक्षितता वाढवण्‍यासाठी आणि एकूण सक्षमता वाढवण्‍यासाठी त्‍यांच्‍या जीवनशैलीमध्‍ये समाविष्‍ट करू शकतात.

पौष्टिक आहारांचे सेवन करत रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यावर लक्ष केंद्रित करण्‍याच्‍या गरजेबाबत बोलताना सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे म्‍हणाल्‍या, ”संपूर्ण जग कोविड-१९ साठी उपचार शोधण्‍यामध्‍ये अथक मेहनत घेत आहे. माझ्या कुटुंबाची सुरक्षितता व उत्तम आरोग्‍याची काळजी घेण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाय घेणे ही माझी जबाबदारी आहे असे मला वाटते. आपण या नवीन नियमांशी जुळवून घेण्‍याचा प्रयत्‍न करत असताना आपण करू शकणारी सर्वात महत्त्वपूर्ण बाब म्‍हणजे नियमित व्‍यायाम आणि योग्‍य पोषण, ज्‍यामध्‍ये बदामांसारखे रोगप्रतिकार शक्‍ती वाढवणारे पदार्थ यांचा समावेश करत आरोग्‍यदायी जीवनशैली स्विकारली पाहिजे. बदामांमध्‍ये झिंक भरपूर प्रमाणात असते, जे वाढ, सर्वांगीण विकास आणि रोगप्रतिकारक शक्‍ती उत्तम ठेवण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावते. माझे कुटुंब व मी दररोज मूठभर बदाम सेवन करण्‍याची खात्री घेतात आणि आम्‍ही इतरांना देखील तसे करण्‍यास प्रोत्‍साहित करतो.”

उत्तम आहार निवड व योग्‍य अल्‍पोपहार सेवन करण्‍याच्‍या सवयींबाबत जागरूकता निर्माण करणे हे आपल्‍या सभोवतालचे विश्‍व या अवघड काळाशी जुळवून घेण्‍याचा प्रयत्‍न करत असताना आरोग्‍यदायी जीवनशैली असण्‍यासाठी अत्‍यंत महत्त्वाचे आहे. सोबतच नित्‍यक्रमामध्‍ये शारीरिक व्‍यायामाचा समावेश करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. सध्‍याच्या अनपेक्षित काळाशी जुळवून घेताना सकारात्‍मक वृत्ती असणे देखील महत्त्वाचे आहे.

सत्रादरम्‍यान पोषण व स्‍वास्‍थ्‍य सल्‍लागार शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, ”सध्‍याच्‍या महामारीने भारतीय कुटुंबांमधील योग्‍य पोषणासाठी असलेली गरज अधिक प्रकर्षाने दाखवली आहे. अनेक भारतीय रक्‍तदाब, हृदयविषयक आजार (सीव्‍हीडी), मधुमेह व लठ्ठपणा यांसारख्‍या आजारांनी पीडित आहेत. काहींच्‍या बाबतीत हे विद्यमान को-मोर्बिडीज आजार असलेल्‍या कोविड-१९ रूग्‍णांचा मृत्‍यू होत आहे. तुम्‍ही या आजारांपैकी कोणत्‍याही आजाराने पीडित असाल किंवा आजार होण्‍याचा धोका असेल तर तुम्ही स्‍वत:च्‍या व कुटुंबाच्‍या दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश करा. बदाम पौष्टिक असण्‍यासोबत शरीराच्‍या एकूण आरोग्‍यासाठी उत्तम आहेत. तसेच बदामांमध्‍ये कॉपर, झिंक, फोलेट, लोह व जीवनसत्त्व इ असते. हे पौष्टिक घटक रोगप्रतिकार शक्‍ती वाढवण्‍यासाठी ओळखले जातात. वर्षानुवर्षे करण्‍यात आलेल्‍या वैज्ञानिक संशोधनामधून हृदयविषयक आरोग्‍य, मधुमेह व वजन नियंत्रण राखण्‍यामध्‍ये रोज बदाम सेवनाचे फायदे दिसून आले आहेत. तर मग, दीर्घकालीन आरोग्‍यदायी लाभांसाठी तुमचे कुटुंब व स्‍वत:च्‍या दैनंदिन आहारामध्‍ये बदामांचा समावेश करण्‍याची खात्री घ्‍या.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading