FTII च्या अध्यक्षपदी दिग्दर्शक शेखर कपूर यांची निवड

पुणे, – फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) च्या अध्यक्षपदी आणि एफटीआयआय गव्हर्निंग कौन्सिलचे चेअरमन म्हणून ज्येष्ठ दिग्दर्शक शेखर कपूर यांची निवड झाली आहे. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यासंदर्भातली घोषणा केली आहे. ३ मार्च २०२३ पर्यंत शेखर कपूर यांचा कालावधी असेल असंही जाहीर करण्यात आलं आहे. या आधी डिसेंबर २०१८ मध्ये बी.पी. सिंग यांची FTII च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. आता मात्र अध्यक्ष म्हणून संवेदनशील दिग्दर्शक शेखर कपूर हे FTII चे अध्यक्ष म्हणून काम पाहतील.

Leave a Reply

%d bloggers like this: