IPL2020 – सनरायजर्स हैदराबादचा पहिला विजय

अबुधाबी – सनराइजर्स हैदराबादच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सवर 15 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात दिल्लीच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाने दिल्लीसमोर 163 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना संघ केवळ 147 धावापर्यंत मजल मारू शकला. आयपीएलच्या तेराव्या हंगामात हैदराबादच्या संघाने पहिला विजय मिळवला आहे. तर, दिल्लीच्या संघाची विजयी हॅट्रिक हुकली आहे.

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात जॉनी बेअरस्टोचे, वॉर्नर, विल्यमसन यांच्या फटकेबाजीच्या जोरावर हैदबादचा संघाने 20 षटकात 4 बाद 162 धावांचे लक्ष्य उभारले. हैदराबादच्या संघाकडून जॉनी बेयरस्टोने 53(48) आणि डेव्हिड वार्नर 45 (33) तर, केन विल्यमसनने केवळ 26 चेंडूत 41 धावा ठोकल्या आहेत. हैदराबादच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ आज डगमगताना दिसला आहे. दिल्लीच्या संघाकडून शिखर धवन याने सर्वाधिक 34 (31 ) धावा केल्या आहेत.

Leave a Reply

%d bloggers like this: