रविवारी राज्यात १८ हजार ५६ कोरोनाचे नवे रुग्ण ३८० बाधितांचा मृत्यू

पुण्यात १५४८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

मुंबई : आज राज्यात कोरोनाचे १८,०५६ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले आहेत. तर ३८० कोरोनाबाधितांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.६६% एवढा आहे. आज १३,५६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. या आकड्यानुसार राज्यात आजपर्यंत एकूण १०,३०,०१५ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ७६.९१% एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६५,६५,६४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १३,३९,२३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९,६४,६४४ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. तर ३०,४६७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ८८,६०० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर उपचार सुरु असलेल्या ११२१ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५९, ९२,५३३ इतकी झाली आहे. यापैकी ९,५६,४०२ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. देशातील ४९,४१,६२८ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मात्र, आतापर्यंत देशातील ९४,५०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

पुणे कोरोना अपडे

  • दिवसभरात १५४८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १५९९ रुग्णांना डिस्चार्ज.
  • ५८ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. १७ रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ९४० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ५२० रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १४२१३६.
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७५८७.
  • एकूण मृत्यू -३३७३.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १२११७६.

  • आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५६१४.

Leave a Reply

%d bloggers like this: