वैद्यकीय बिल पूर्तीच्या यादी कोवीड-19 चा समावेश करा – शिक्षक हितकारिणी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


पुणे – कोरोना आजाराच्या भारतीय संसर्गाचा पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कोविड -19 आजाराचा समावेश वैद्यकीय बील पूर्तीच्या यादीत करण्याची मागणी शिक्षक हितकारणी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्र्यांकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पुणे शहरासह राज्यात व देशात कोरोना आजाराचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर बळावलेला आहे. याचा ताण शासकीय यंत्रणेवर येत असून सरकारी कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी कोविड -19 आजाराचा वैद्यकीय बिल मूर्तीच्या यादीत समावेश असणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना खाजगी रुग्णालयात सेवा घेता येणे शक्य होईल. या महत्त्वपूर्ण मागणीचा मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून कोविड -19 आजाराचा समावेश वैद्यकीय बिल पूर्तीच्या यादीत करावा अशी मागणी संघटनेच्यावतीने अध्यक्ष प्रकाश पवार यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: