Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

पक्षांतर म्हणजे मतदारांच्या विश्वासाचा अवमान; बाळा नांदगावकरांचा हल्लाबोल

मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडी आणि कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी पक्षांतराच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. एखादा उमेदवार पक्षाच्या चिन्हावर आणि विचारधारेवर निवडणूक लढवून विजयी होतो. मतदारही त्या पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवून मतदान करतात. त्यामुळे निवडून आल्यानंतर पक्ष बदलणे म्हणजे केवळ पक्षाचाच नव्हे, तर लाखो मतदारांच्या विश्वासाचाही अवमान असल्याचे त्यांनी म्हटले.
नांदगावकर यांनी सत्ताधारी भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा साधत, विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचे राजकारण सुरू असल्याचा आरोप केला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत लोकप्रतिनिधींना सांभाळून ठेवण्याची वेळ पक्षांवर आली असल्याचेही त्यांनी टोला लगावला.

ठाकरे आणि पवार कुटुंबांच्या राजकीय योगदानाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या राजकारणात या दोन कुटुंबांचा मोठा प्रभाव राहिला आहे. समाजासाठी त्यांनी दिलेले योगदान दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचे प्रयत्न झाले, तरी जनतेकडून त्याला पाठिंबा मिळणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मतदान प्रक्रियेबाबतही प्रश्न उपस्थित केला. जनतेचा पूर्ण विश्वास असल्याचा दावा करणाऱ्यांनी निवडणुका पुन्हा मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली. जगातील अनेक देशांमध्ये आजही मतपत्रिकेद्वारे मतदान होत असल्याचे सांगत त्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत (EVM) शंका उपस्थित केली.
राज्यात सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर नांदगावकर यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading