लोकसेवा म्हणजेच ईश्वरसेवा, लोकप्रतिनिधींना जनतारूपी ईश्वराचा आशीर्वाद आवश्यक – प्रा डॉ. गजानन एकबोटे

पुणे, दि. २० – महानगरपालिकेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या अध्यक्ष व नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांच्या विकासनिधीतून प्रभाग क्र.१४ मधील गरजू महिला व होतकरू तरूणींना सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मनिर्भर बनवण्याच्या हेतूने २०० महिलांना शिवणयंत्र वाटप करण्याचा शुभारंभ आज प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष मा.प्रा.डॉ.गजानन एकबोटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
महिलांनी त्यांच्या पायावर उभे राहावे. स्वावलंबी बनावे आणि कुटुंबाला आत्मनिर्भर बनवावे यासाठी त्यांना सक्षम करणेचे गरजेचे आहे. असे मत .डॉ.गजानन एकबोटे यांनी यावेळी मांडले .लोकप्रतिनिधी जनतेची सेवा करण्यात कटिबध्द असतात त्यांना या जनतारूपी ईश्वराची साथ असणे गरजेचे आहे. कोरोना काळात आपण एकमेकांना मदत करणे आवश्यक आहे. कठीण काळ आपली परीक्षा घेत असून आपण अतिशय संयमाने ,धीराने या संकटाला सामोरे जाऊ असे ते म्हणाले. देशाला नरेंद्र मोदींच्या रूपाने एक कणखर पंतप्रधान मिळाले आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त अशी विधायक कार्यक्रम राबवणारे मा.नरेंद्रजी मोदी हे पहिलेच पंतप्रधान आहेत . महिलांना देण्यात आलेल्या शिवणयंत्राच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली . शिवणयंत्राच्या माध्यमातून महिला वर्ग आपली कला घडवेल आणि आपला संसाराचा गाडा चालवेल असे उद्गार त्यांनी काढले. यावेळी काढले नगरसेविका प्रा.सौ.ज्योत्स्ना एकबोटे
आणि त्यांचे सर्वच कुटुंबातील सदस्य कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणात मदतकार्य करत आहेत. मोफत मास्क,अन्नधान्य वाटप, त्यासोबतच परप्रांतीयांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी मदत करणे, प्रभागात वेगवेगळ्या ठिकाणी गरजू कुटुंबांना अन्नधान्याचे वाटप करणे अशा प्रकारचे अविरत कार्य एकबोटे कुटुंबीय करत आहे. हा कार्यक्रम भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्या उपस्थितीत पार पडला. या कोरोना काळात मतदारसंघातील रूग्णांना हाॅस्पिटल मध्ये जागा उपलब्ध करून देण्यापासून ते रक्तदाते शोधणे, प्लास्मा दान करण्याचे आवाहन करणे, रुग्णवाहिका रिक्षाची व्यवस्था करणे असे अनेक लोकपयोगी उपक्रम सातत्याने एकबोटे कुटुंबियांकडून शहरवासीयांसाठी चालवले जातात त्याबद्दल त्यांचे आभार पांडे यांनी मानले. या कार्यक्रमाला रघुनाथ येमूल गुरुजी,अध्यक्ष,डिकाई, मा.प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे,अध्यक्षा, अवनी संस्था,
मा.डाॅ.नंदकिशोर एकबोटे, नियामक मंडळ सदस्य प्रो.ए.सो, रविंद्र साळेगावकर, अध्यक्ष, भाजपा, शिवाजीनगर मतदारसंघ इ मान्यवर उपस्थित होते.
तसेच या कार्यक्रमाला सुरक्षित अंतर राखत प्रभागातील अनेक नागरिक व भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी सहभागी झाले होते. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह प्रा. शामकांत देशमुख यांनी आभार मानले. त्यांनी कोरोन काळात चालणाऱ्या सर्व विधायक उपक्रमांचा आढावा घेतला. तसेच नगरसेविका प्रा. ज्योत्स्ना गजानन एकबोटे यांच्या माध्यमातून सेवा सप्ताह निमित्त दरोरोज शंभर लोकांना मोफत जेवण देण्यात येत आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन राजन देवकते, दत्तात्रय पाटोळे, विलास लाड, ऋषिकेश कोंढाळकर , मंगेश नलावडे, सुरज दरेकर, यांनी केले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: