fbpx
Friday, April 26, 2024
MAHARASHTRAPUNETOP NEWS

सलग दुसऱ्या दिवशी २३ हजार एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण झाले बरे

पुण्यात १६५८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ, ५९ जणांचा मृत्यू

मुंबई, दि.१९ : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी २३ हजार ५०१ एवढ्या विक्रमी संख्येने रुग्ण बरे होऊन घरी  सोडण्यात आले असून ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून आज २१ हजार ९०७ नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ८ लाख ५७ हजार ९३३ पोहोचली आहे. राज्यभरातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या देखील कमी झाली आहे. सध्या २ लाख ९७ हजार ४८० रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली.

आज निदान झालेले २१,९०७ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले ४२५ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-२२११ (५०), ठाणे- ३३७ (१७), ठाणे मनपा-४०२ (१), नवी  मुंबई मनपा-४०६ (८), कल्याण डोंबिवली मनपा-४७१ (१), उल्हासनगर मनपा-५२ (१), भिवंडी निजामपूर मनपा-३७ (१), मीरा भाईंदर मनपा-१९२ (८), पालघर-१९९ (३), वसई-विरार मनपा-२५५ (७), रायगड-४५६ (१५), पनवेल मनपा-२१० (१), नाशिक-३८६ (१), नाशिक मनपा-११४१ (६), मालेगाव मनपा-१७ (१), अहमदनगर-७४४ (८),अहमदनगर मनपा-१८६ (३), धुळे-४४, धुळे मनपा-६०(१), जळगाव-५९७ (७), जळगाव मनपा-११९ (२), नंदूरबार-११३ (२), पुणे- १३६६ (१२), पुणे मनपा-१७४५ (३९), पिंपरी चिंचवड मनपा-९१९ (४), सोलापूर-५३८ (१६), सोलापूर मनपा-६७, सातारा-७६७ (२६), कोल्हापूर-५२७ (२०), कोल्हापूर मनपा-१७९ (५), सांगली-६६२ (१७), सांगली  मिरज कुपवाड मनपा-२९० (९), सिंधुदूर्ग-६० (३), रत्नागिरी-३३५ (४), औरंगाबाद-१८२ (७),औरंगाबाद मनपा-३५१ (७), जालना-१२७, हिंगोली-५९, परभणी-६२ (३), परभणी मनपा-३८ (३), लातूर-२१७ (४), लातूर मनपा-८५ (१), उस्मानाबाद-२५८ (५), बीड-१६९ (४), नांदेड-१९१ (३), नांदेड मनपा-२१७ (१), अकोला-१०९ (५), अकोला मनपा-१३० (८), अमरावती-११८ (१), अमरावती मनपा-१८८, यवतमाळ-३४८ (१३), बुलढाणा-१२७ (१), वाशिम-४२ (२), नागपूर-४७७ (१४), नागपूर मनपा-१५६९ (२२), वर्धा-९७ (३), भंडारा-२०२ (११), गोंदिया-२३३ (१), चंद्रपूर-९० (१), चंद्रपूर मनपा-७० (३), गडचिरोली-३० (२), इतर राज्य- ३१ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५७ लाख ८६ हजार १४७ नमुन्यांपैकी ११ लाख ८८ हजार १५ नमुने पॉझिटिव्ह ( २०.५३ टक्के) आले आहेत. राज्यात १८ लाख  ०१ हजार १८० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३९ हजार ८३१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ४२५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.७१ टक्के एवढा आहे.

पुणे कोरोना अपडेट १९ सप्टेंबर

  • दिवसभरात १६५८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात १२४८ रुग्णांना डिस्चार्ज.
  • पुण्यात ५९ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. २० रूग्ण पुण्याबाहेरील.
  • ९५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ४९५ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या १३००८१.
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १७६६४.
  • एकूण मृत्यू -३०४६.

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- १०९३७१.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading