Wednesday, June 24, 2026
Latest NewsPUNESports

पै. विजय चौधरी यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर

पुणे : ट्रिपल महाराष्ट्र केसरी व पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक पै विजय नथू चौधरी यांनी कुस्तीमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस विभागामध्ये प्रतिष्ठेचे मानले जाणारे पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक जाहीर झाले आहे. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी ही माहिती पत्रकाद्वारे कळविली आहे.

दरवर्षी महाराष्ट्र पोलीस विभागात विविध विभागातील प्रवर्गामध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल, उल्लेखनीय सेवेबद्दल, राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक प्राप्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा बोधचिन्ह व प्रशस्तीपत्रक प्रदान करीत सन्मान करण्यात येतो. यावर्षी यामध्ये पै विजय चौधरी यांचा यावर्षी सन्मान करण्यात येणार आहे.

चौधरी यांनी २०१४, २०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील सायगाव बगळीचे रहिवासी असलेले चौधरी हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे विभागात येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. हिंद केसरी पै रोहित पटेल यांच्याकडून ते कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत. जागतिक स्तरावर पोलीस दलासाठी ऑलिम्पिक मानले जात असलेल्या जागतिक पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत नुकतेच चौधरी यांनी १२५ किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading