fbpx
Sunday, May 19, 2024
BusinessLatest News

क्रिकेटचा उत्साह वाढवण्यासाठी जेएसडब्ल्यू पेंट्सने ‘रंगों का खेल है’ या गीताचे केले अनावरण

मुंबई : जेएसडब्ल्यू पेंट्स ही भारतातील आघाडीची पर्यावरण-अनुकूल पेंट कंपनी आहे आणि 23 अब्ज डालरच्या जेएसडब्ल्यू समूहाचा भाग आहे. या कंपनीने देशातील क्रिकेटच्या रंगीबेरंगी उत्साहाचा आनंद साजरा करण्यासाठी डिजिटल-फर्स्ट मोहिमेचे अनावरण केले आहे. नवीन मोहिमेतील सर्वात अद्वितीय घटकांपैकी एक म्हणजे यातील ‘रंगूनचा खेळ’ हे गीत. क्रिकेटच्या खेळाशी निगडित असलेली एकात्म भावना साजरी करण्यासाठी हे गीत  तयार केले आहे.

जेएसडब्ल्यू पेंट्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि महिला प्रीमियर लीग (WPL) फ्रँचायझीमधील सहा संघांसोबत भागीदारी केली आहे. जेएसडब्ल्यू पेंट्सची ही सर्वात मोठी ब्रँड असोसिएशन आहे आणि त्यात WPL आणि IPL च्या चालू आवृत्त्यांमध्ये शाहरुख खानच्या सह-मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, गुजरात जायंट्स, UP वॉरियर्स आणि JSW ग्रुपच्या सह-मालकीच्या दिल्ली कॅपिटल्ससह सहा संघांसोबत भागीदारी करण्यात आलेली आहे.

जेएसडब्ल्यू पेंट्सचे जॉइंट एमडी आणि सीईओ एएस सुंदरसन यांच्या मते, “क्रिकेट हा एक खेळ आहे जो भारतीयांच्या हृदयाची धडकन आहे. हा जीवनाचा एक मार्ग आहे, रंगांचा उत्सव आहे. आयपीएल आणि डब्ल्यूपीएल या दोन्ही स्पर्धांमधील नामांकित संघांसोबत भागीदारी करून, आम्ही केवळ आमच्या ब्रँडची उपस्थिती वाढवत नाही तर खेळाच्या वारशाचा अविभाज्य घटक बनू इच्छितो. क्रिकेटला नेत्रदीपक बनवण्यासाठी रंग ज्या प्रकारे एकत्र येतात,  त्याला ‘रंगो का खेल है, रंगों का मेल है..’ या गीताच्या माध्यमातून जेएसडब्लू पेंट्सने केलेला गौरव आहे.

टीबीडब्ल्यूए/इंडियाचे सीईओ गोविंद पांडे म्हणाले की, “हे गीत आयपीएल आणि डब्ल्यूपीएलच्या चाहत्यांच्या आणि खेळाडूंच्या रंगांच्या विविधतेमध्ये क्रिकेटच्या खेळाबद्दल उत्कटतेने आणि प्रेमात एकता साजरे करते. सर्व रंग समान असून, जेएसडब्ल्यू पेंट्सकडून अजून एक सुंदर विचार मांडला गेला आहे.”

“आमच्या गाण्याच्या बोलामध्ये क्रिकेटचे सर्व प्रकारचे रंग आहेत.  जेएसडब्ल्यू पेंट्सच्या व्हायब्रंट श्रेणीचे प्रतिबिंब आहे. विविध संघांचे खेळाडू आणि चाहते यांना क्रिकेट एकत्र आणते. त्यातील प्रत्येकाचे वेगळे रंग आहेत. तशीच आमच्या विविध रंगांची श्रेणी संपूर्ण भारतातील घरांना एकत्र आणते, त्यांना चैतन्य आणि जीवन देते. हा एक सुंदर समन्वय आहे जो क्रिकेट आणि जेएसडब्ल्यू पेंट्स या दोन्हींचे सार प्रतिबिंबित करते, ” असे रसेल बॅरेट, सीसीएक्सपो, टीबीडब्ल्यूए/इंडिया  यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading