टाटा कंपनीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूकदारांनी केली १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक
मुंबई : टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्स कंपनी लिमिटेड (टाटा एआयए) या भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपनीची एयुएम अर्थात गुंतवणूकदारांनी कंपनीच्या विविध योजनांमध्ये गुंतवलेली रक्कम १ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तीन वर्षांहून कमी कालावधीत कंपनीचे एयुएम ५०,००० कोटी रुपयांवरून (ऑगस्ट २०२१) १,००,००० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. इंडिविज्युअल न्यू बिझनेस प्रीमियममध्ये झालेली प्रचंड वाढ आणि गुंतवणुकीची दमदार कामगिरी यामुळे एयुएममधील वाढीला प्रोत्साहन मिळाले आहे.
टाटा एआयएचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकी अय्यर म्हणाले, “तीन वर्षांहून कमी कालावधीत आमचे एयुएम दुपटीने वाढणे ही बाब आमच्या ग्राहकांनी आमच्या नाविन्यपूर्ण योजना आणि सेवा अनुभवांवर दर्शविलेला विश्वास, आमचे एजंट्स व सहयोगी यांचा पाठिंबा आणि आमच्या गुंतवणूक टीमची लक्षणीय कामगिरी दर्शवते. आमच्या ग्राहकांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करत राहू व त्यांना प्रत्येक वेळेसाठी सज्ज बनवू.”
आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये चार कोहोर्ट्समध्ये (१३व्या, २५व्या, ३७व्या आणि ६१ व्या महिन्यात) पहिले रँकिंग मिळवून टाटा एआयएने पर्सिस्टन्सीमध्ये उद्योगक्षेत्रातील आघाडीची कामगिरी बजावली. पर्सिस्टन्सीमध्ये कंपनीने मिळवलेली आघाडी टाटा एआयएच्या ग्राहकांनी दरवर्षी पॉलिसीचे नूतनीकरण करून ब्रँडवर सातत्याने दर्शविलेला विश्वास दर्शवते. प्रीमियमचा नियमितपणे भरणा केला जाणे ही खूप महत्त्वाची बाब आहे कारण त्यामुळे ग्राहकाचे आर्थिक सुरक्षा कवच कायम राहते आणि त्यांना पॉलिसीच्या संपूर्ण कालावधीत लाभांचा आनंद घेता येतो.
टाटा एआयएच्या दावे निकाली लावले जाण्याच्या दरामध्ये देखील सुधारणा झाली. ०.७१% नी वाढत जाऊन हा दर डिसेंबर २०२३ मध्ये ९९.१९% वर पोहोचला.
टाटा एआयएचे गुंतवणूक धोरण पॉलिसीधारकांप्रती अतूट निष्ठा दर्शवते. सर्वोत्तम, सातत्यपूर्ण आणि जोखीम समायोजित दीर्घकालीन परताव्यांवर लक्ष केंद्रित करत बॉटम-अप स्टॉक-पिकिंग धोरण अवलंबिले जाते. मॉर्निंगस्टार रेटिंग्सने ३१ मार्च २०२४ रोजी टाटा एआयएच्या ९१% एयुएमला ५ वर्षांच्या आधारे ४ किंवा ५ स्टार दिले आहेत. फंड्सनी विविध कालावधींमध्ये त्यांच्या मापदंडांपेक्षा सरस कामगिरी केली आहे आणि ती या तक्त्यामधून दिसून येते.
| टाटा एआयए फंड्स | एयुएम (कोटी रुपयांमध्ये) | १ वर्ष परतावा % | १ वर्ष मापदंड परतावा % | ५ वर्ष परतावा % | ५ वर्ष मापदंड परतावा % |
| मल्टी कॅप फंड | ५,२९९.५९ | ४९.६०% | ३६.६९% | २६.६७% | १५.५३% |
| टॉप २०० फंड्स | १,६६३.३४ | ४८.५९% | ३६.६९% | २५.६३% | १५.५३% |
| इंडिया कन्झम्पशन फंड | १,५०८.४२ | ५२.५६% | ३६.६९% | २५.१८% | १५.५३% |
| इमर्जिंग अपॉर्च्युनिटीज फंड | ९९७.७७ | ६६.०८% | ५७.४३% | लागू नाही | लागू नाही |
