आंबडवे गाव आत्मनिर्भर प्रकल्पाला सुरुवात


मंडणगड (आंबवडे), दि. 18 – दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे यांनी काही दिवसांपूर्वी भारतरत्न डॉ.बाबासाहेब यांचे मूळ गाव आंबडवे उद्योग ,व्यवसाय करून संपूर्ण गाव स्वयपूर्ण ,आत्मनिर्भर बनविण्याची घोषणा केली होती.त्याची आज प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली. हा प्रकल्प डिक्की, खादी ग्रामोद्योग आयोग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणारे आणि बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त सहकार्याने होणार आहे.
या वेळी मिलिंद कांबळे म्हणाले की ,लवकरच आंबवडे गाव देशात एक आदर्श रोल मॉडेल ठरेल असा संकल्प आपण केला आहे.त्याबरोबरच या गावात आपण उदबत्ती,सोलर चरखा ,रुमाल उद्योग या सारखे प्रत्येक घरी एक व्यवसाय सुरू करणार आहोत .या गावात उत्पादित झालेला माल हा अतिशय उच्च दर्जाचा असणारं आहे शिवाय भविष्यात या वस्तू निर्यात करण्याचा संकल्प असल्याचे जाहीर केले.
या वेळी खादी ग्राम उद्योग च्या वतीने व्यवसाय करण्यासाठी प्रत्यिक्षिक दाखविण्यात आले.
या वेळी केंद्रीय खादी ग्राम उद्योग आयोगाचे उप कार्यकारी अधिकारी संजय हेडाव ,राज्य खादी विभागाचे अधिकारी ए. एल.मीना., डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठाचे समन्वयक प्रा.संजय खोब्रागडे ,बँक ऑफ बडोदा मंडगड शाखेचे व्यवस्थापक अझरुद्दीन संदे ,पंचायत समिती विस्तार अधिकारी राजेंद्र मोहिते ,माजी सरपंच अल्पेश सपकाळ,आंबवडे प्रकल्प समन्वयक नरेश सपकाळ तसेच अधिकारी व गावकरी महिला युवक या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: