केंद्रीय मंत्री नितीन गडकरी कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. नितीन गडकरी यांनीच ट्विटरवरून आपल्याला कोरोना झाल्याची माहिती दिली. कोरोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे नितीन गडकरी यांनी स्वत:ला आयसोलेट करुन घेतलं आहे. 

‘काल मला अशक्तपणा वाटत असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेतला. यानंतर तपासणी करताना माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली. सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छांमुळे माझी प्रकृती चांगली आहे. मी स्वत:ला आयसोलेट करून घेतलं आहे. तसंच ज्या व्यक्ती माझ्या संपर्कात आल्या असतील, त्यांनी काळजी घ्यावी आणि नियम पाळावेत. सुरक्षित राहा,’ असं ट्विट नितीन गडकरी यांनी केलं आहे. 

संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी करण्यात आलेल्या कोरोना टेस्टमध्ये लोकसभेतील मिनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे यांच्यासह १७ खासदारांना कोरोनाची लागण झाली. संसदेचं अधिवेशन सुरू होण्याआधी खासदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, त्यात ५ खासदार पॉझिटिव्ह आले होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: