Saturday, June 20, 2026
MAHARASHTRAPUNETOP NEWS

राज्यात आज 17 हजार 66 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, तर 257 जणांचा मृत्यू

पुण्यात 1100 नविन कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई, दि. 14 – महाराष्ट्रात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. याशिवाय कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. आज राज्यात 17,066 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 257 जणांचा कोरोनामुळे बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय आज 15,789 जणांनी कोरोना विरुद्धची लढाई जिंकली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेता राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता 10,77,374 इतकी झाली आहे. याशिवाय आतापर्यंत 7,55,850 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात 2,91,256 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

दरम्यान, मुंबई शहरामध्ये आज 2,256 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 31 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,71,949 इतकी झाली आहे. सध्या 31,063 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याशिवाय आतापर्यंत 1,32,349 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 8,178 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेने माहिती दिली आहे.

पुणे शहर ..!
………

  • दिवसभरात 1100 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
  • दिवसभरात 1456 रुग्णांना डिस्चार्ज.
  • 39 करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू.
  • एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 120757
  • ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 17393
  • एकूण मृत्यू – 2832
  • एकूण डिस्चार्ज- 100532

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading