Wednesday, September 2, 2026
ENTERTAINMENTTOP NEWS

कंगना रनौतला ‘Y’ दर्जाची सुरक्षा; जाणून घ्या ‘Y’ सुरक्षा नक्की कशी असते

शिवसेना आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतच्या वादात आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उडी घेतली आहे. कंगनाला आता Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. कंगना विरुद्ध शिवसेना वाद पेटला आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी कंगनाला ९ तारखेला मुंबई पाय ठेवूनच दाखवं अशी धमकीच दिली आहे. एवढंच नाहीतर सेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाचे थोबाड फोडणार असं जाहीर वक्तव्य केले आहे. कंगना रनौत विरोधात सुरू असलेल्या आंदोलनामुळे तिला केंद्रीय गृह मंत्रालयाकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणात घेतलेली भूमिका पाहता केंद्र सरकारने थेट भूमिका घेतली आहे.

‘Y’ दर्जा सुरक्षा नक्की कशी असते

Y दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थेत एकूण 11 सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. यात दोन कमांडो तैनात असतात. ही सुरक्षा 24×7 असते. आता ही सुरक्षा व्यवस्था थेट सीआरपीएफ सांभाळू शकते.

दरम्यान, आपल्याला Y दर्जाची सुरक्षा मिळाल्यामुळे कंगना रनौतने अमित शहा यांचे आभार मानले आहे. ‘मला दिलेली ही सुरक्षा हे प्रमाण आहे की, देशात कोणत्याही देशभक्ताची आवाज कुणीही थांबवू शकत नाही.’ असं वक्तव्य करत कंगनाने शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचले आहे. ‘मला वाटलं अमित शहा हे मला काही दिवस मुंबईत न जाण्याचा सल्ला देतील. पण, त्यांनी भारताच्या एका मुलीने दिलेल्या वचनाचा मान राखला आहे. माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाचा आदर राखला आहे’ अशा शब्दात कंगनाने अमित शहा यांचे आभार मानले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading