Wednesday, September 2, 2026
PUNE

‘महा कला मंडल’च्या शिष्टमंडळाने घेतली शरद पवार यांची भेट

पुणे, दि. 7 – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत महा कला मंडल च्या शिष्टमंडळाची नुकतीच पुणे येथे मिटिंग झाली.
या भेटी मध्ये प्रामुख्याने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कला प्रकारातील एकत्रित झालेल्या 120 संघटनांची माहिती पवार साहेबांनी घेतली.
कायमस्वरूपी सर्व कलावंताची अडचण सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कामगार कल्याण मंडळाच्या धर्तीवर कलाकार कल्याण मंडळ शासनाने स्थापन करून कलावंतांची अडचणी दूर करण्याचे काम या मंडळामार्फत व्हावे, तसेच सर्व कलावंतांचा आरोग्य विमा शासनाने या मंडळ मार्फत काढावा, तसेच कलावंत साठी घरकुल योजना, आपत्कालीन तातडीची मदत, विविध कला प्रकारात काम करणाऱ्या कलावंतांची नोंद शासनाकडे व्हावी, अशा विविध गोष्टी चा निर्णय शासनाने ताबडतोब घेण्यासाठी मा. पवार साहेबांनी या आठवड्यात मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. सांस्कृतिक मंत्री, आणि महा कला मंडल चे प्रतिनिधी यांची संयुक्त मिटिंग लावण्याची सूचना सी. एम ऑफिस ला दिल्या,
पवार साहेबांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतल्यामुळे, महाकलामंडल च्या शिष्ट मंडळ ला अतिशय आनंद झाला. लवकरच ही मीटिंग होईल अशी अशा आहे,
या शिष्ट मंडळात महा कला मंडल चे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे, जयमाला काळे इनामदार, पूजा पवार साळुंखे आदी उपस्तित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading