Wednesday, September 2, 2026
NATIONALTOP NEWS

कोरोना विस्फोट – आता भारत पोहचला दुसऱ्या क्रमांकावर

नवी दिल्ली, दि. ७ – देशातील कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. कोरोनाबाधितांच्या यादीत भारत आता ब्राझीलला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. देशात मागील २४ तासांमध्ये तब्बल ९० हजार ८०२ नवे करोनाबाधितांची नोंद झाली असून, देशात कोरोनाबाधितांचा आकडा ४२ लाखांच्या पार गेली आहे. गेल्या २४ तासांत १ हजार १६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगात सर्वाधिक कोरोनाबाधितांच्या यादीत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला असून, भारताच्या पुढे आता केवळ अमेरिका आहे. देशातील एकूण ४२ लाख ४ हजार ६१४ कोरोना रुग्णांमध्ये ८ लाख ८२ हजार ५४२ Active रुग्ण आहेत. आतापर्यंत ३२ लाख ५० हजार ४२९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलं आहे. आतापर्यंत ७१ हजार ६४२ जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading