Wednesday, September 2, 2026
ENTERTAINMENT

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा कोरोना पॉझिटिव्ह

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरनंतर त्याची प्रेयसी मलायका अरोरा हिचीदेखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मलायकाची बहीण अमृता अरोराने याला दुजोरा दिला आहे. काही तासांपूर्वी अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवरून त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अर्जुन होम क्वॉरन्टाइन राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. अर्जुनमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. दरम्यान, मलायकाच्या ‘इंडियाज बेस्ट डान्सर्स’ या शोच्या सेटवर काही दिवसांपूर्वी सात जणांना करोनाची लागण झाल्याचे वृत्त आले होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading