एकता कपूरच्या व्हर्जिन भास्कर चे प्रसारण थांबवा – संभाजी ब्रिगेडची मागणी
पुणे, दि. 7 – राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास हा महाराष्ट्रासह देशाला प्रेरणा देणार आहे. एकता कपूरच्या वेबसिरीज मध्ये त्यांच्या नावाचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे, सरकारने तात्काळ व्हर्जिन भास्कर चे प्रसारण थांबवावे अशी मागणी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी केली आहे.
या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रकात संभाजी ब्रिगेड ने म्हटले आहे की, शिंदे घराण्याची लेक पुढे होळकर घराण्याची सून झाली ती इतिहास घडवायला. मात्र एकता कपुर यांच्या Vargin_Bhaskar या वेबसिरीज मध्ये सेक्स संदर्भातील संशोधनात (वेबसिरीज मध्ये) राजमाता अहिल्याराणी होळकर यांच्या नावाने चालणाऱ्या ‘अहिल्याबाई गर्ल हॉस्टेल’ चे नाव तसेच त्यातील प्रसंग दाखवण्यात आले आहे. जो हॉस्टेल आणि परिसरात वेब सिरीज मध्ये फक्त सेक्स आणि आणि त्या संबंधित गोष्टी केल्या जातात त्या ठिकाणच्या होस्टेलला राजमाता अहिल्याराणी होळकरांसारख्या देशाच्या महान तत्वज्ञानी महाराणीचे असे नाव देऊन अपमान करणाऱ्या ZEE5 आणि ALTBalaji या निर्मात्या कंपनीचा जाहीर निषेध…
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सांस्कृतिक मंत्री यांनी विशेष लक्ष घालून आपल्या महापुरुषांची वेब सिरीज मध्ये होणारी बदनामी तत्काळ थांबवावी व महाराष्ट्र हे देशात या वेब सिरीज चे प्रदर्शन तात्काळ थांबवावे. बंदी घालावी. अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडची आहे.
