Thursday, June 11, 2026
ENTERTAINMENT

‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मध्‍ये अलाद्दिन व यास्‍मीनचा मृत्‍यूचा सूड घेण्‍यासाठी राखेमधून पुनर्जन्‍म

असे म्‍हटले जाते की, इतिहासाची पुनरावृत्ती होते! सोनी सबवरील आवडती जोडी अलास्‍मीन त्‍यांची न संपलेली कथा पुन्‍हा रचण्‍यासाठी राखेमधून जिवंत होते. मालिका अलाद्दिन: नाम तो सुना होगामध्‍ये पूर्णत: नवीन अवतारामध्‍ये योद्धे अलाद्दिन व यास्‍मीनचा पुनर्जन्‍म होताना पाहायला मिळणार आहे.

आपल्‍याला माहितच आहे की, अलाद्दिनचे वडिल उमर यांचे बलिदान आणि जफर (आमिर दळवी) शक्तिशाली अय्यर म्‍हणून प्रकट झाल्‍यानंतर अ‍ल्लाद्दिन व यास्‍मीनचा मृत्‍यू होतो. प्रेक्षकांनी या आघाडीच्‍या जोडीचा नवीन अवतार पाहण्‍यास सज्‍ज राहा, जेथे ही जोडी पुनर्जन्‍म घेणार आहे. पुनर्जन्‍माच्‍या या रोमांचक कथानकासह फासे पुन्‍हा फिरले आहेत आणि त्‍यांच्‍या भूमिकांमध्‍ये देखील बदल झाला आहे. अलाद्दिनची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम आता राजकुमारच्‍या वेषात दिसणार आहे, तो एक घमंडी व बिघडलेला राजकुमार बनला आहे. दुसरीकडे आशी सिंगने साकारलेली भूमिका यास्‍मीन ऊर्फ काली चोरनी गरीबांची साहसी मसीहा म्‍हणून उदयास आली आहे. अलास्‍मीनचा रोमांचक नवीन साहसी प्रवास पुन्‍हा सुरू होतो आणि खरा प्रश्‍न असा आहे की, यावेळी त्‍या दोघांना एकमेकांच्‍या जवळ येण्‍याचा मार्ग कसा सापडेल? ते त्‍यांच्‍या मृत्‍यूचा सूड घेण्‍यामध्‍ये यशस्‍वी होतील का?

मालिका अलाद्दिन: नाम तो सुना होगामध्‍ये नवीन चेहरे पाहायला मिळणार आहेत. अलाद्दिनचे वडिल सुल्‍तानच्‍या भूमिकेत हर्ष वशिष्‍ठ,कोयलच्‍या भूमिकेत शिवानी बदोनी आणि राजकुमार अलाद्दिनचा प्रतिस्‍पर्धी शीफानच्‍या भूमिकेत अमित रघुवंशी हे कलाकार मालिकेमधील प्रमुख भूमिकांमध्‍ये सामील होणार आहेत.

अलाद्दिन व यास्‍मीन रोमांचक घटना सादर करत असताना प्रेक्षकांना स्मिता बंसलने साकारलेली भूमिका अम्‍मी नव्‍या रूपात दिसणार आहे. अम्‍मी ऊर्फ रूख्‍सार बेगम प्रेमळ मुख्‍याध्‍यापि‍केच्‍या रूपात दिसेल, जी विद्यार्थ्‍यांसाठी स्‍पेशल अकॅडमी चालवते. पुनर्जन्‍म, पुनर्शोध व सूडाचा हा प्रवास कसा पुढे जाईल, ही रोमांचक साहसाची सुरूवात आहे का?

सिद्धार्थ निगम म्‍हणाला,”अलाद्दिन व यास्‍मीनच्‍या दु:खद मृत्‍यूनंतर नशीबाने या जोडीला पुन्‍हा जिवंत केले आहे. शाही घराण्‍यामध्‍ये राजकुमार म्‍हणून जन्‍मलेला अलाद्दिन घमंडी व बिघडलेला मुलगा आहे आणि तो त्‍याच्‍या मर्जीप्रमाणे वागतो. त्‍याला त्‍याचे नशीब व भविष्‍याबाबत माहित नाही. राजकुमार अलाद्दिनला राजाप्रमाणे जीवन जगायला आवडते आणि हा नवीन अलाद्दिन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्‍यासोबत त्‍यांच्‍या चेह-यांवर हास्‍य आणेल. मी मालिका अलाद्दिन: नाम तो सुना होगामधील या नवीन साहसाबाबत खूपच उत्‍सुक आहे. मालिका रोमांचपूर्ण साहसाची खात्री देते आणि नवीन चेहरे मालिकेमध्‍ये अधिक रोमांचची भर करतील.

आशी सिंग म्‍हणाली,”आतापर्यंतचा साहसी प्रवास राहिला आहे आणि मी आमच्‍या प्रेक्षकांसमोर पूर्णत: नवीन यास्‍मीन सादर करण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. यास्‍मीन ऊर्फ काली चोरनी प्रेक्षकांना आतापर्यंत मालिकेमध्‍ये पाहायला मिळालेल्‍या रूपापेक्षा खूपच वेगळी असणार आहे. तिचे जीवन वेगळे आहे आणि ती गरीबांची रक्षणकर्ता आहे. यास्‍मीन धाडसी आहे आणि तिचा काली चोरनीचे रूप धारण करत समाजातील अन्‍यायाविरोधात लढण्‍यावर विश्‍वास आहे. मला एकाच मालिकेमध्‍ये अशा विविध भूमिका साकारण्‍याची संधी मिळाल्‍याने खूप आनंद होत आहे. मला विश्‍वास आहे की, प्रेक्षक या नवीन प्रवासाचा भरपूर आनंद घेतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading