fbpx
Monday, June 17, 2024

Month: July 2022

Latest NewsPUNE

प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय : विजय पराडकर

पुणे – प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय असते. शब्दांसह, शब्दविरहित असे चित्रांचे प्रकार असले तरी त्यात तुलना होऊ शकत नाही. आषय व्यक्त होण्यासाठी शब्दांची आवश्यकता असते, चित्राखालील ओळीतून शब्द हवेत असे माझे मत आहे. व्रत म्हणून व्यंगचित्र काढत आलो आहे. व्यंगचित्रकाराकडेे जादूचा चश्मा असतो तो माझ्याकडेही आहे. या जादूच्या चष्म्यामुळे मला व्यक्तीच्या मागील बाजूही दिसते ती विनोदाची असते, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजय पराडकर यांनी केले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा वाढदिवस आणि त्यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या कारकिर्दीलाही 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व्यंगचित्रांच्या दुनियेतील त्यांच्या या प्रवासाला सलाम करण्यासाठी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन‘ या मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आणि गंगोत्री होमस्‌‍ ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालनात ‘सलाम हसऱ्या रेषांना‘ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनातील अखेरच्या दिवशी पराडकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संवादाचा विषय होता भाषा रेषांची. त्यावेळी त्यांनी नोकरी ते व्यंगचित्रकार असा प्रवास उलगडला. पराडकर यांच्याशी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन‘चे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत यांनी संवाद साधला. गंगोत्री होमस्‌‍ ॲन्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर यांनी पराडकर यांचा सृतीचिन्ह देऊन सत्कार केला. ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन‘चे माजी अध्यक्ष चारुहास पंडित तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. व्यंगचित्रकाराकडे अपघाताने वळलो असे सांगून पराडकर म्हणाले, लहानपणापासून विनोदी साहित्य वाचनाची तसेच चित्र काढण्याचीही आवड होती. वेगवेगळ्या प्रकारची चित्र काढत होतो. स्पर्धेत पाठविलेल्या चित्राला पारितोषिक मिळाल्यानंतर या कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. नोकरी करता करता व्यंगचित्र काढत होतो. निवृत्त झाल्यानंतर 1996 नंतर पूर्णवेळ या कलेला वाहून घेतले. चित्र काढण्याची कल्पना कशी सुचते हे सांगता येत नाही पण हाती कागद घेतला की चित्र कागदावर उतरतात. दीड–दोन तासात 17 चित्र काढली असल्याची आठवण त्यांनी सांगितली. शाळेतील आठवण सांगताता ते म्हणाले, शिक्षकांनी चित्र काढायला सांगितले होते, सगळी मुले चित्र काढत असताना मी वाकड्या–तिकड्या रेषा काढून चित्र काढत होतो. त्यावेळी शिक्षक माझ्या शेजारी कधी येऊन बसले ते मला कळलेच नाही. चित्र पाहून ते चिडतील असे वाटले; पण त्यांनी माझ्या चित्राचे कौतुक केले. पायाचे दुखणे असलेल्या व्यक्तीने माझे व्यंगचित्र पाहिले. चित्र पाहून पायाचे दु:ख विसरलो असे जेव्हा त्या व्यक्तीने सांगितले त्यावेळी ते माझ्या व्यंगचित्रासाठीचे सर्वात मोठे मानधन मिळाल्याची भावना झाली.

Read More
Latest NewsPUNE

आयएमए कडून एनपीआयसी, एआयआयएमएस यांच्या सह्योगाने कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

पुणे  : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्याकडून बीएएसएफ आणि नॅशनल पॉयझन इन्फॉर्मेशन सेंटर (एनपीआयसी ), एआयआयएमएस – नवी दिल्ली यांच्या

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अतिवृष्टीबाधितांना यंत्रणांनी तातडीने सहाय्य करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद  :- अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येकाला वेळेत मदत मिळावी यासाठी मराठवाड्यातील बाधित शेतकरी, नागरिकांना तातडीने आवश्यक ते सहाय्य करण्याचे आदेश

Read More
Latest NewsPUNE

‘स्वरउन्मेष’मध्ये रसिकांनी अनुभवला युवाकालाकारांचा कलाविष्कार

पुणे : युवाकालाकारांच्या बहारदार गायनाने रंगलेली एक अनोखी सांगीतिक मैफल रसिकांनी शनिवारी अनुभविली. स्वर-सुरांच्या तालात उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या रात्रीच्या मैफिलीत

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

देशाच्या अर्थव्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे – केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

नाशिक : देशाच्या अर्थ व्यवस्थेत छोटे उद्योग व्यवसायिकांचे योगदान महत्त्वाचे असते. ही बाब विचारात घेऊन या लहान उद्योग व्यवसायांना पीएम स्वनिधी

Read More
Latest NewsPUNE

राज्यात परिवर्तनाची सुरुवात पिंपरी चिंचवड मधून : कृष्णा अल्लावरू

पिंपरी :  केंद्रातील मोदी, शहा यांचे हुकुमशाही सरकार आणि घटनेची पायमल्ली करून महाराष्ट्रात आरूढ झालेले शिंदे, फडणवीस सरकार घालविण्यासाठी अखिल

Read More
Latest NewsPUNE

राज्यपाल कोश्यारी यांना भाजपने प्रवक्ते पदी नेमावे : ॲड. सचिन भोसले

पिंपरी : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केंद्र सरकारने परत बोलावून त्यांची भाजपच्या प्रवक्ते पदी नेमणूक करावी. मागील कार्यकाळात आणि काल

Read More
Latest NewsPUNE

लोकमान्य टिळकांना रंगावली व दिव्यांतून मानवंदना

पुणे : भारताच्या स्वातंत्र्याकरिता स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच… अशी सिंहगर्जना करणा-या लोकमान्य टिळकांना भव्य

Read More
Latest NewsPUNE

सैनिक आणि भारतवासियांचे एकमेकांविषयी असलेले प्रेम व्यक्त करणारे माध्यम म्हणजे राखी – निवृत्त ब्रिगेडियर प्रसाद जोशी

पुणे : सिमेवरील सैनिकांसाठी त्यांच्या घरुन राखी येते, ती पोस्टाने किंवा प्रत्यक्षपणे आली, तरी हा त्यांच्यासाठी भावनास्पर्शी प्रसंग असतो. त्यावेळी

Read More
Latest NewsPUNE

संजय राऊत यांना ईडी ने ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

पुणे:मुंबई मधील पत्राचाळ प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी हजर झाले होते.

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

ईडी मला अटक करणार मी झुकणार नाही मी सच्चा शिवसैनिक – खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मुंबई : शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Read More
Latest NewsPUNE

दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देत रंगला ‘बेल्स इन रेझोनन्स’चा पहिला दिवस

पुणे : घुंगरांचा छंद, सुर आणि वाद्यांच्या तालाच्या निनादात नेत्र व कर्णसुखाची अनुभुती घेत व दिग्गजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याच

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले

मुंबई-पत्राचाळ घोटाळ्या प्रकरणी संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीसाठी त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर त्यांच्या

Read More
Latest NewsPUNE

तर लोकसहभागातून बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूसचा पाणी प्रश्न सोडवू! -चंद्रकांत पाटील

  पुणे:पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणं काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागात पिण्याच्या

Read More
Latest NewsPUNE

भरतनाट्यम आणि कथकमधून सादर झाला उत्कट भावनांचा अविष्कार

पुणे : लयबध्दरित्या होणारी शरीराची हालचाल, अतिशय नजाकतीने केलेल्या भावमुद्रा, चपळाईने केलेला पदन्यास असा नृत्याचा अतिशय सुंदर कलाविष्कार सादर झाला.

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

शिवसेनेच्या ताब्यातून मुंबई जावी साठी राज्यपालांनी हा इशारा दिला -प्रवीण गायकवाड

पुणे:  मुंबई ही मराठी माणसाची आहे. मुंबई ही आमची आहे .आर्थिक राजधानी हि फक्त मराठी माणसाने केली आहे. राज्यपाल भागतसिंह

Read More
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

ईडी ची कारवाई कोणावर होते आणि कोणावर होत नाहीये.आणि हे संपूर्ण महाराष्ट्र पहात आहे -रूपाली चाकणकर

पुणे : मुंबई मधील पत्राचाळ प्रकरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पथक आज सकाळी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी चौकशीसाठी हजर

Read More
Latest NewsPUNE

ज्ञानाची निष्ठा आणि शिक्षकांची प्रतिष्ठा वाढायला हवी : डॉ. रामचंद्र देखणे

पुणे : संस्कार, आचार, शील आणि जाणिवा जपणारे शिक्षण हेच खऱ्या अर्थाने जीवनशिक्षण होय. पण आज जीवनशिक्षण ही संकल्पनाच बाजूला

Read More
Latest NewsPUNE

गायन-बासरीची जुगलबंदी आणि संतूराच्या सुरात रसिक मंत्रमुग्ध

पुणे : गायन आणि बासरीची सुरेल जुगलबंदी आणि उत्तरार्धात रंगलेले संतूरवादन ऐकण्यात रसिक मंत्रमुग्ध झाले. गायन वादनाची एक अनोखी सांगीतिक

Read More