आयएमए कडून एनपीआयसी, एआयआयएमएस यांच्या सह्योगाने कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) यांच्याकडून बीएएसएफ आणि नॅशनल पॉयझन इन्फॉर्मेशन सेंटर (एनपीआयसी ), एआयआयएमएस – नवी दिल्ली यांच्या सहकार्याने २५० डॉक्टर्स आणि वैद्यकीय विद्यार्थी यांच्यासाठी कंटिन्यूईंग मेडिकल एज्युकेशन (सीएमइ) वर एका विशेष व्हर्च्युअल ट्रेनिंगचे आयोजन केले. ह्या प्रशिक्षणाचे उद्दिष्ट हे वैद्यकीय व्यवसायातील सहकाऱ्यांना मान्यताप्राप्त प्रोटोकॉल्स (नियमावली) अनुसार अपघाती कृषी रासायनिक विषबाधांच्या घटनांची हाताळणी आणि निदान व उपचारांच्या प्रोटोकाल्स विषयी एक उजळणी देणे हा होता.
भारतामध्ये शेती हा आपल्या संलग्न क्षेत्रांसह उपजिविकेचा सर्वात मोठा मार्ग आहे. भारतीय ग्रामीण कुटुंबांपैकी ७० टक्के अद्यापही आपल्या उपजिविकेसाठी प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असतात आणि भारतामध्ये १०० दशलक्षाहून जास्त शेतकरी असल्यामुळे अपघाती कृषी रासायनिक विषबाधेच्या घटना घडतच असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि स्थानिक रुग्णालये यामधील डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी हे अशा दुर्दैवी घटनांचे व्यवस्थापन आणि हाताळणी करण्यात आघाडीवर असतात. त्यामुळे कोणतीही घटना घडल्यानंतर पहिल्या काही थोड्याच तासांमध्ये अचूक शोध, योग्य रोगनिदान आणि तात्काळ उपचार केले जाणे आवश्यक असते.
डॉ. देबव्रत कानुंगो, मेडिको टॉक्सिकॉलॉजी, ह्यूमन हेल्थ रिस्क ॲसेसमेन्ट ॲण्ड फूड सेफ्टी या विषयावरील जागतिक तज्ञ यांनी एका सखोल प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. विशिष्ट केसस्टडीज् मार्फत त्यांनी विषबाधेच्या प्रसंगांची हाताळणी आणि त्यावरील उपचार याविषयीची कार्यपद्धती समजावून सांगितली.
कंटिन्यूड मेडिकल एज्युकेशनचे महत्त्व अधोरेखित करीत असताना, डॉ. सहजानंद प्रसाद सिंग, नॅशनल प्रेसिडेन्ट, आयएमए (एचक्यू) म्हणाले, की‘‘शिक्षण ही कधीच न संपणारी प्रक्रिया असते आणि वैद्यकशास्त्रामधील सर्वात अलिकडची प्रगतिविषयी अद्ययावत माहिती करून घेणे हे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असते आणि आयएमएचा हा प्रशिक्षण कार्यक्रम डॉक्टरांना अपघाती कृषीरासायनिक विषबाधेच्या प्रसंगांचे निदान व उपचार करण्यासाठी मदत करील. आयएमए मध्ये आम्ही सर्वजण आपल्या देशातील शेतकऱ्यांवर परिणाम करणाऱ्या ह्या महत्त्वाच्या विषयावरील प्रशिक्षणाचा प्रस्ताव मांडणाऱ्या व त्याला सहाय्य करणाऱ्या बीएएसएफची प्रशंसा करतो. एक जबाबदार पीक संरक्षण साधन पुरवठादार या नात्याने यातून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेबाबत बीएएसएफची बांधिलकी अधोरेखित होते.’’
‘‘शेती हे पृथ्वीवरील सर्वात मोठे काम आहे. कोणताही दुर्दैवी प्रसंग घडल्यावर आपल्या शेतकऱ्यांची सेवा करीत असलेल्या सन्माननीय आयएमए आणि एनपीआयसी यांना मदत करणे ही बीएएसएफ म्हणून आमच्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. कृषीक्षेत्रातील आघाडीवरील एक उद्योग या नात्याने आमच्या ‘सुरक्षा हमेशा’ उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना सुरक्षित व नीतीपूर्ण व्यवस्थापनाच्या बाबीवर ज्ञान देत असताना आम्हाला हे माहित असते की आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने एकत्रितरीत्या प्रयत्न केले पाहिजेत. आयएमए आणि एनपीआयसी यांनी त्यांच्या प्रशिक्षण सत्रामध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही मनापासून आभारी आहोत’’ असे राजेन्द्र वेलागला, बिझिनेस डायरेक्टर, ॲग्रिकल्चरल सोल्यूशन्स, साऊथ एशिया, बीएएसएफ म्हणाले.
