Sunday, June 14, 2026
Latest NewsPUNE

प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळी, अनाकलनीय : विजय पराडकर

पुणे – प्रत्येक व्यंगचित्रकाराची शैली वेगळीअनाकलनीय असतेशब्दांसहशब्दविरहित असे चित्रांचे प्रकार असले तरी त्यात तुलना होऊ शकत नाहीआषय व्यक्त होण्यासाठी शब्दांची आवश्यकता असतेचित्राखालील ओळीतून शब्द हवेत असे माझे मत आहेव्रत म्हणून व्यंगचित्र काढत आलो आहेव्यंगचित्रकाराकडेे जादूचा चश्मा असतो तो माझ्याकडेही आहेया जादूच्या चष्म्यामुळे मला व्यक्तीच्या मागील बाजूही दिसते ती विनोदाची असतेअसे प्रतिपादन ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजय पराडकर यांनी केले.

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शिफडणीस यांचा वाढदिवस आणि त्यांच्या शब्दविरहित हास्यचित्रांच्या कारकिर्दीलाही 70 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त व्यंगचित्रांच्या दुनियेतील त्यांच्या या प्रवासाला सलाम करण्यासाठी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइन‘ या मराठी व्यंगचित्रकारांची संघटना आणि गंगोत्री होमस्‌‍ ॲन्ड हॉलिडेज यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्व कलादालनात ‘सलाम हसऱ्या रेषांना‘ या व्यंगचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होतेप्रदर्शनातील अखेरच्या दिवशी पराडकर यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होतासंवादाचा विषय होता भाषा रेषांचीत्यावेळी त्यांनी नोकरी ते व्यंगचित्रकार असा प्रवास उलगडलापराडकर यांच्याशी ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइनचे अध्यक्ष संजय मिस्त्री आणि सचिव योगेंद्र भगत यांनी संवाद साधलागंगोत्री होमस्‌‍ ॲन्ड हॉलिडेजचे संचालक मकरंद केळकर यांनी पराडकर यांचा सृतीचिन्ह देऊन सत्कार केला. ‘कार्टूनिस्टस्‌‍ कम्बाइनचे माजी अध्यक्ष चारुहास पंडित तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

व्यंगचित्रकाराकडे अपघाताने वळलो असे सांगून पराडकर म्हणालेलहानपणापासून विनोदी साहित्य वाचनाची तसेच चित्र काढण्याचीही आवड होतीवेगवेगळ्या प्रकारची चित्र काढत होतोस्पर्धेत पाठविलेल्या चित्राला पारितोषिक मिळाल्यानंतर या कलेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललानोकरी करता करता व्यंगचित्र काढत होतोनिवृत्त झाल्यानंतर 1996 नंतर पूर्णवेळ या कलेला वाहून घेतले.

चित्र काढण्याची कल्पना कशी सुचते हे सांगता येत नाही पण हाती कागद घेतला की चित्र कागदावर उतरतातदीडदोन तासात 17 चित्र काढली असल्याची आठवण त्यांनी सांगितलीशाळेतील आठवण सांगताता ते म्हणालेशिक्षकांनी चित्र काढायला सांगितले होतेसगळी मुले चित्र काढत असताना मी वाकड्यातिकड्या रेषा काढून चित्र काढत होतोत्यावेळी शिक्षक माझ्या शेजारी कधी येऊन बसले ते मला कळलेच नाहीचित्र पाहून ते चिडतील असे वाटलेपण त्यांनी माझ्या चित्राचे कौतुक केलेपायाचे दुखणे असलेल्या व्यक्तीने माझे व्यंगचित्र पाहिलेचित्र पाहून पायाचे दु: विसरलो असे जेव्हा त्या व्यक्तीने सांगितले त्यावेळी ते माझ्या व्यंगचित्रासाठीचे सर्वात मोठे मानधन मिळाल्याची भावना झाली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading