Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

भारतातील पहिली प्रगत ‘डेका अगेन प्रो प्लस’ लेझर प्रणाली आता पिंपरीच्या डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल!

पिंपरी : भारतातील त्वचाविकार क्षेत्रात एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक मैलाचा दगड प्रस्थापित झाला आहे. पिंपरी, पुणे येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या त्वचाविकार विभागाने देशातील पहिली ‘डेका अगेन प्रो प्लस’ (DEKA Again Pro Plus) ही अत्याधुनिक लेझर प्रणाली रुग्णांच्या त्वचाविकारासाठी कार्यान्वीत करण्यात आली आहे.

नको असलेले केस काढणे (Hair Reduction), त्वचेवरील नसांचे क्लिष्ट विकार (Vascular Lesions) आणि सौंदर्यात्मक त्वचा उपचारांसाठी ही जगातील सर्वात प्रगत लेझर प्रणाली मानली जाते. इटलीतील फ्लोरेन्स येथील ‘DEKA M.E.L.A. s.r.l.’ या जागतिक अग्रगण्य कंपनीने विकसित केलेले हे तंत्रज्ञान भारतात आणणारे डीपीयू हे संपूर्ण देशातील पहिले आणि एकमेव रुग्णालय ठरले आहे.

पारंपारिक लेझर यंत्रे प्रामुख्याने पाश्चिमात्य (गोऱ्या) त्वचेसाठी डिझाइन केलेली असतात, ज्यामुळे भारतीय सावळ्या किंवा गडद त्वचेवर त्याचे दुष्परिणाम होण्याचा धोका असतो. यावर उपाय म्हणून या मशीनमध्ये Alexandrite 755 nm आणि Nd:YAG 1064 nm या अत्यंत शक्तिशाली ‘ड्युअल-वेव्हलेंथ’ (Dual-Wavelength) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे, जी भारतीय त्वचेसाठी अत्यंत सुरक्षित व प्रभावी ठरते.

डेका अगेन प्रो प्लस’ची ५ मुख्य वैशिष्ट्ये

  • ५०% वेगाने उपचार (Ultra-Fast): या प्रणालीची क्षमता २५ kW इतकी प्रचंड आहे. यामुळे नेहमीच्या लेझरच्या तुलनेत यात ५०% कमी वेळ लागतो. संपूर्ण शरीरावरील हेअर रिडक्शन उपचार अवघ्या २० मिनिटांपेक्षा कमी वेळात पूर्ण होऊ शकतात.
  • अल्ट्रा शॉर्ट पल्स तंत्रज्ञान: या प्रगत तंत्रज्ञानामुळे अगदी बारीक, फिकट रंगाच्या केसांच्या मुळांवरही अचूक मारा केला जातो.
  • दुखण्याशिवाय सुरक्षित उपचार (Zero Pain & No Downtime): यात प्रगत कूलिंग (थंडावा देणारे) तंत्रज्ञान आणि ‘मोव्हिओ’ (Moveo) तंत्रज्ञान आहे. हे त्वचेवरील ऊर्जेचे परावर्तन कमी करते, ज्यामुळे रुग्णाला उपचारादरम्यान अजिबात वेदना किंवा आग जाणवत नाही.
  • अष्टपैलू प्रणाली (Versatility): एकाच प्लॅटफॉर्मवर केस काढण्यासोबतच, त्वचेवरील पिगमेंटेशन (गडद डाग) घालवणे आणि त्वचा पुन्हा टवटवीत व तरुण करणे (Skin Rejuvenation) सहज शक्य होते.
  • त्वरित परिणाम: आधुनिक जीवनशैलीत व्यस्त असलेल्या रुग्णांसाठी हे कमीत कमी वेळात सर्वोत्तम निकाल देणारे अचूक साधन आहे.

मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे), “डेका अगेन प्रो प्लस प्रणाली भारतात आणणारे आमचे रुग्णालय हे देशातील पहिले रुग्णालय ठरले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. रुग्णांना जागतिक दर्जाची अचूकता देणे, त्यांचा उपचाराचा वेळ वाचवणे आणि त्यांना अत्यंत आरामदायी व वेदणारहित अनुभव देणे, हाच आमचा उद्देश आहे. हे पाऊल आमच्या क्लिनिकल उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेला अधोरेखित करते.”

 डॉ. भाग्यश्री पी. पाटील (प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे), “आम्ही नेहमीच सर्वसमावेशक आणि जागतिक दर्जाचे वैद्यकीय तंत्रज्ञान रुग्णांच्या सेवेत आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. भारतीय रुग्णांच्या त्वचेच्या वैविध्यपूर्ण गरजा आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन आणलेले हे तंत्रज्ञान सुरक्षितता आणि गुणवत्तेचे नवीन निकष प्रस्थापित करेल.”

डॉ. रेखा आर्कोट (अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे), “हा केवळ एक नवीन उपकरणाचा अंतर्भाव नसून भारतातील त्वचा उपचारांचा चेहरामोहरा बदलणारे पाऊल आहे. आमच्या तज्ज्ञ त्वचाविकार तज्ज्ञांच्या देखरेखीखाली रुग्णांना आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैद्यकीय उपचार पुण्यातच मिळतील.”

डॉ. आयुष गुप्ता (विभागप्रमुख, त्वचाविकार विभाग, डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी, पुणे), “या लेझर प्रणालीमुळे लेझर त्वचा उपचारांकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन बदलला आहे. ५०% कमी वेळेत, अचूकतेशी तडजोड न करता, रुग्णांना अचूक व सुरक्षित उपचार देणे आता आम्हाला शक्य झाले आहे.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading