Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNESports

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन

  • 6 हजारांहून अधिक सायकलस्वारांचा सहभाग अपेक्षित

पुणे : संसदीय स्थायी समितीच्या (विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, वने व हवामान बदल) अध्यक्षा, राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या पुढाकारातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून दर वर्षी “पुणे ऑन पेडल्स” ही सायकल रॅली आयोजित केली जाते. यावर्षी सर्वांच्या सोयीसाठी हा उपक्रम 13 सप्टेंबर 2026 रविवार सकाळी 6.00 वाजता संपन्न होणार आहे.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी सांगितले की, सायकल वापरण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गेल्या सहा वर्षांपासून आयोजित केला जात आहे. सायकलचे शहर अशी पुण्याची ओळख आहे. सायकल वापरणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. यंदाच्या सायकल रॅलीतही सहा हजारांहून अधिक सायकलस्वारांनी सहभाग सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

त्या पुढे म्हणाल्या, “ही रॅली केवळ सायकल चालविण्याचा कार्यक्रम नसून सामाजिक बांधिलकी, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यजागृतीचा संदेश देणारा उपक्रम आहे. नागरिक, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या चळवळीला बळ द्यावे.”

सायकल रॅलीचा मार्ग :
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे.
मार्ग : कर्वे रोड – गुडलक चौक मार्गे वळून डेक्कन जिमखाना बस स्टॉप, छत्रपती संभाजी महाराज
पुतळा, खंडोजी बाबा चौक, सावरकर स्मारक मार्गे कर्वेरोड मार्गे परत

फॅमेली वॉकेथॉन / चालणे (वॉकिंग / रनिंग):
प्रारंभ : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
सांगता : बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे
मार्ग : कर्वे रोड – नळ स्टॉप वळण कर्वे रोड मार्गे परत

या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या विद्यार्थ्यांना सायकल रॅली व फॅमेली वॉकेथॉन साठी नोंदणी करावयास सांगावे व आपली संख्या कळवावी ही विनंती. सहभागींनी स्वत: ची सायकल व पाण्याची बाटली सोबत घेऊन यावी. सायकल नसणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना तसेच शिक्षकांना ‘चालण्याच्या उपक्रमात’ (वॉकेथॉन मध्ये) सहभागी होता येईल. यावेळी काही गरजू मुलामुलींना सायकलचे मोफत वाटप करण्यात करण्यात येणार आहे. रॅलीत सहभागी प्रत्येकाला पदक, प्रमाणपत्र आणि टी-शर्ट देऊन गौरविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading