अवाडा इलेक्ट्रोतर्फे सेबीकडे 7,600 कोटी रु.च्या आयपीओसाठी यूडीआरएचपी 1 सादर
भारतातील आघाडीच्या व्हर्टिकल एकात्मिक सौर फोटोव्होल्टेइक उत्पादकांपैकी एक असलेल्या अवाडा इलेक्ट्रो लिमिटेडने 31 जुलै 2026 रोजीच्या कार्यरत सौर सेल आणि मॉड्यूल उत्पादन क्षमतेच्या आधारे 7,600 कोटी रु.च्या आयपीओसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे अद्ययावत ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (यूडीआरएचपी) दाखल केला आहे. कंपनीच्या प्रस्तावित आयपीओमध्ये 1,600 कोटी रु.किंमती पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि 6,000 कोटी रु.पर्यंतच्या किंमतीची ऑफर फॉर सेल (OFS) यांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण ऑफरचा आकार 7,600 कोटी रु.पर्यंत असेल. इक्विटी शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रती शेअर 5 रु. आहे. 6,000 कोटी रु.पर्यंतची ऑफर फॉर सेल (OFS) प्रवर्तक विक्री समभागधारक अवाडा व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडकडून करण्यात येईल. फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग प्रामुख्याने कंपनीने घेतलेल्या काही कर्जांशी आणि लेटर्स ऑफ क्रेडिटअंतर्गत स्वीकारलेल्या दायित्वांशी संबंधित
Read More