Tuesday, November 17, 2026

Day: August 17, 2026

Latest NewsPUNETOP NEWS

हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदम

पुणे  : गृह (शहरे), महसूल, ग्रामविकास व पंचायतराज, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण तसेच अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री

Read More
Latest NewsPUNE

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून विशेष सत्कार

  पुणे: पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना त्यांच्या उल्लेखनीय आणि कर्तव्यदक्ष सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मानाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

‘याबाबत आता बोलणे योग्य नाही, पण…’; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेस प्रवेशाच्या चर्चेवर महादेव जानकरांचे भाष्य

मुंबई प्रतिनिधी : दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या संभाव्य काँग्रेस प्रवेशाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर

Read More
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

नवनाथ वाघमारे यांच्या वादग्रस्त वक्तव्याने मराठा समाजात संताप

जालना : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तणावाचे वातावरण असतानाच ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या

Read More
Latest NewsPUNE

स्वर मिलन कार्यक्रमात शास्त्रीय संगीताबरोबरच गझल रंगात रंगले पुणेकर रसिक

पुणे : शास्त्रीय संगीताचे चाहते अशी ओळख असणाऱ्या पुणेकर रसिकांनी स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येस शास्त्रीय संगीत आणि नृत्याबरोबरच गझल गायनाचा देखील आनंद

Read More
Latest NewsPUNE

समृद्रातून जाणाऱ्या डेटा केबल्सच्या सुरक्षेला प्राधन्य देत भारताने सक्षम अंडरवॉटर डोमेन अवेअरनेस धोरण राबविण्यावर भर द्यावा – माजी नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कमांडंट व्हाइस अॅडमिरल अनिल जग्गी यांनी दिली ‘जय’ (JAI) ही त्रिसूत्री पुणे  : जगभरातील इंटरनेट वाहतूक

Read More
Latest NewsPUNE

वैष्णवी भोसले हिचा एससी प्रवर्गात एमपीएससी गट-ब संयुक्त परीक्षेत राज्यात मुलींमध्ये प्रथम क्रमांक

पुणे : दीपस्तंभ फाउंडेशन- मनोबल प्रकल्पातील विद्यार्थिनी वैष्णवी भोसले हिने एमपीएससी गट-ब संयुक्त परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. वैष्णवीची

Read More
Latest NewsPUNE

आरपीआय ख्रिश्चन आघाडीच्या १६ नवीन शाखांचे पुण्यात उद्घाटन

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या ख्रिश्चन आघाडीच्या १६ नवीन शाखांचे पुणे शहरात भव्य उद्घाटन करण्यात आले. पक्षाची संघटनात्मक

Read More
BusinessLatest News

CDSL IPF आणि अमर चित्र कथा यांच्या तर्फे बहुभाषिक गुंतवणूकदार शिक्षण माहितीपट सादर

मुंबई : सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (CDSL) इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (IPF) ने विचारपूर्वक आर्थिक नियोजन आणि माहितीपूर्ण गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी बहुभाषिक गुंतवणूकदार शैक्षणिक माहितीपट सादर केला आहे. अमर चित्र कथा यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या या फिल्म मधून गुंतवणुकीशी संबंधित महत्त्वाच्या संकल्पना रंजक कथाकथनाच्या माध्यमातून सोप्या पद्धतीने समजावून सांगण्यात आल्या आहेत. त्यामुळे विविध भौगोलिक क्षेत्रांतील आणि विविध लोकसंख्याशास्त्रीय गटांतील गुंतवणूकदारांना या संकल्पना सहज समजण्यास आणि त्यांच्याशी जोडून घेण्यास मदत होते. द गार्डन ऑफ प्रॉस्पेरिटी या अॅनिमेटेड चित्रपटात अकबर आणि बिरबल एका नवविवाहित जोडप्याला त्यांच्या लग्नात मिळालेल्या भेटवस्तूंची योग्य पद्धतीने गुंतवणूक कशी करावी हे समजावून सांगताना दाखवले आहेत. बागेची निगा राखण्याच्या उदाहरणाचा वापर करून ते उद्दिष्टाधारित गुंतवणुकीचे महत्त्व, विविध आर्थिक उद्दिष्टांनुसार गुंतवणुकीत विविधता आणणे, वेगवेगळ्या काळातल्या उद्दिष्टांशी गुंतवणुकीची सांगड घालणे आणि आपत्कालीन निधी राखून ठेवणे याबाबत माहिती देतात. रंजक कथानकाच्या माध्यमातून हा चित्रपट गुंतवणुकीची महत्त्वाची तत्त्वे सोप्या पद्धतीने समजावून सांगतो आणि दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी शिस्तबद्ध आर्थिक नियोजन करण्यास प्रोत्साहित करतो. हा चित्रपट इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिया आणि आसामी अशा 12 भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील गुंतवणूकदारांच्या विविध घटकांपर्यंत व्यापक पोहोच सुनिश्चित होते. या उपक्रमाबाबत बोलताना CDSL IPF सचिवालय प्रमुख श्री. सुधीश पिल्लई म्हणाले: “CDSL IPF मध्ये आमचा विश्वास आहे की गुंतागुंतीच्या संकल्पना सोप्या आणि सहज समजणाऱ्या कथांच्या माध्यमातून मांडल्या गेल्या तर आर्थिक शिक्षण अधिक प्रभावी ठरते. अकबर आणि बिरबल यांच्या कालातीत ज्ञानाची आर्थिक नियोजनाच्या व्यावहारिक धड्यांशी सांगड घालत, हा बहुभाषिक चित्रपट विविध वयोगटांतील आणि भौगोलिक क्षेत्रांतील लोकांसाठी गुंतवणूक समजून घेणे अधिक सोपे करतो. चित्रपट आणि कॉमिक्स यांसारख्या रंजक माध्यमांच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी उद्दिष्टाधारित गुंतवणुकीचा अवलंब करावा, आत्मविश्वासाने भविष्यासाठी तयारी करावी आणि माहितीपूर्ण व जबाबदार पद्धतीने सिक्युरिटी बाजारात सहभागी व्हावे यासाठी आम्ही त्यांना प्रोत्साहन देत आहोत.” परिचित व्यक्तिरेखा आणि कथानकांच्या माध्यमातून आर्थिक संकल्पना सोप्या पद्धतीने समजावून सांगणारी मालिका विकसित करण्यात येत आहे. गुंतवणूकदार शिक्षण कॉमिक्सची मालिका विकसीत करण्यासाठी CDSL IPF आणि अमर चित्र कथा यांच्या सहकार्याने या उपक्रमाची बांधणी करण्यात आली आहे. या मालिकेत द अनऑफिशियल उस्ताद आणि द गोल्डन पीकॉक फ्रॉड यांसारख्या शीर्षकांचाही समावेश आहे. यामुळे विविध वयोगटांतील आणि प्रदेशांतील लोकांसाठी आर्थिक शिक्षण अधिक सर्वसमावेशक आणि सुलभ होण्यास मदत होत आहे. व्यक्तींना #AtmanirbharInvestor होण्यासाठी सक्षम करत देशभरातील गुंतवणूकदार जागरूकता उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी CDSL IPF वचनबद्ध आहे. फिल्म पाहण्यासाठी लिंक: YouTube: https://www.youtube.com/watch?v=ozVo2ZfzlSc

Read More
Latest NewsSports

ग्रेट ब्रिटनच्या गॅरेथ पॉट्स, केली फिशर यांना सलग दुसऱ्यांदा विजेतेपद !!

पुणे :  बिलीयर्डस्‌ अँड स्नुकर फेडरेशन ऑफ इंडिया (बीएसएफआय) आणि अपेक्स्‌ स्पोर्ट्‌स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या ‘डब्ल्युपीए हे-बॉल जागतिक

Read More
BusinessLatest News

अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र मायक्रोफिन तर्फे आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर

डीआरएचपी लिंक: https://www.axiscapital.co.in/contents/Svatantra%20Microfin%20Limited%20%20-%20DRHP-1786646535.pdf अनन्या बिर्ला यांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र मायक्रोफिन लिमिटेड ही सर्वसमावेशनावर लक्ष केंद्रित करणारी बिगर-बँकिंग वित्तीय कंपनी असून भारतीय अर्थव्यवस्थेतील कुटुंबांना आर्थिक स्वावलंबन प्राप्त करून देण्यासाठी तसेच तळागाळातील उद्योजकांना सक्षम करण्यासाठी कार्यरत आहे. कंपनीने आयपीओसाठी सेबीकडे डीआरएचपी सादर केला आहे. या आयपीओमध्ये 1,500 कोटी रु.चे फ्रेश इश्यू आणि 1,500 कोटी रु.ची ऑफर फॉर सेल यांचा समावेश असून, एकूण इश्यूचा आकार 3,000 कोटी रु. आहे. फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर कंपनीचा टियर I भांडवली आधार वाढवण्यासाठी केला जाणार आहे. व्यवसाय आणि

Read More